संस्कृती-समाजकार्याचा वसा जपणारे भायखळ्याचे ‘प्रफुल्ल क्रीडा मंडळ’ – eNavakal
मुंबई

संस्कृती-समाजकार्याचा वसा जपणारे भायखळ्याचे ‘प्रफुल्ल क्रीडा मंडळ’

मुंबई – भायखळ्याची पूर्वीची इराणी वाडी आता प्रफुल्ल को. ऑप. हौसिंग सोसायटी नावाने ओळखली जाते. कै. मनोहर लक्ष्मण साने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रफुल्ल क्रीडा मंडळाने सन १९७१ साली या नवरात्रोउत्सवाची सुरुवात केली.

इराणी वाडीतच असलेल्या श्री. ईश्वटि जागेवाला महाराज या जागृत स्थानाशेजारी पहिली दोन-तीन वर्षे अंबेमातेची मूर्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घडवून नवरात्रोउत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर उत्सवाची जागा बदलून ती इराणी वाडीच्या पटांगणात घेण्यात आली. गेली ४५ वर्षे कै. अरविंद चव्हाण हे प्रफुल्ल क्रीडामंडळाच्या अंबेमातेची सहा फुटाची उभी मूर्ती घडवीत आहेत. मोठ्या उत्साहाने सांस्कृतिक परंपरा जपून मंडळाच्यावतीने उत्सव साजरा करण्यात येतो.

जसजशी वर्षे सरत गेली तसे उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. उत्सव मोठा होत गेला त्याबरोबर मंडळाची  सामाजिक क्षेत्रात मधील जबाबदारी वाढत गेली. वाढत्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मंडळाचे नाव भायखळा विभागामधील अग्रगण्य मंडळांच्या यादीत नेऊन ठेवले.

आतापर्यंत मंडळाच्यावतीने विभागिय नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, रक्तगट तपासणी शिबिर यांचे आयोजन तसेच विभागीय विद्यार्थ्यांनकरिता शैक्षणिक शिबिर, सहलीचे आयोजन केले गेले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता शैक्षणिक पारितोषिकेही गेली कित्येक वर्षे दिली जातात. मंडळाच्यावतीने गेल्या वर्षी पर्यावरण हितासाठी संपुर्ण उत्सव प्लास्टिक बंदीचा संकल्प समोर ठेवून साजरा केला. यंदाही त्याच संकल्पनेने अध्यक्ष रामदास नाईक आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्सव साजरा करीत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

एसआरए पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत येणार

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार्‍या पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय शासनाच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. अशी माहिती वाद्रे येथील...
Read More
post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागेवाडी गावाजवळ ट्रॅव्हल्स जळून खाक

जालना – जालना – औरंगाबाद रोडवरील नागेवाडी गावाजवळ पुण्याहून येणारी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजता शॉर्ट सर्किटमुळे घडली. सुदैवाने या...
Read More
post-image
News विदेश

पाकिस्तानविरोधात आता अफगाणिस्तानही सरसावला

नवी दिल्ली- काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानातून रसद आल्याचे पुढे आल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संताप आहे. पाकिस्तानविरोधात असाच संताप दुसरे शेजारी इराण आणि अफगाणिस्तान...
Read More