संसदेचे काम १४ दिवसांमध्ये फक्त ७ तास झाले  – eNavakal
देश मंत्रालय

संसदेचे काम १४ दिवसांमध्ये फक्त ७ तास झाले 

नवी दिल्‍ली – संसदेतील कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे अनेक  दिवस ठप्प झाले होते . पाच मार्चपासून प्रारंभ झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसर्‍या टप्प्यात दोन्ही सदनांचे 74 तास वाया गेले असून, त्यामुळे  11.10 कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकार लवकरच खासदारांची वेतनवाढ करणार असल्याचेही वृत्त आहे.

गोंधळी खासदारांमुळे काहीही कामकाज होत नसले तरी त्यांच्या वेतनात मात्र भरघोस वाढ होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात खासदारांचा भत्ता वाढण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. खासदारांना दर महिन्याला मिळणारा मतदार संघ भत्ता, कार्यालय आणि संपर्क भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. फर्निचरसाठी मिळणार्‍या भत्त्यातही 75 हजारांवरून 1 लाख रुपये वाढ करण्यात आली आहे.

मतदारसंघ भत्त्यात 45 हजारांवरून 75 हजार, तर कार्यालयीन भत्ता 45 हजारांवरून 60 हजार रुपये करण्यात आला आहे. यात 20 हजार रुपये स्टेशनरीच्या खर्चासाठी तसेच 40 हजार रुपये संगणक साक्षर व्यक्‍तीला संसद सचिवालयात नियुक्‍त करण्यासाठी दिला जातो. या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर 39 कोटी 22 लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. भत्ते वाढल्यानंतर प्रतिखासदार खर्च  50 हजार रुपये वाढून 3 लाख रुपयांपर्यंत जाणार आहे.

 गेल्या 13 दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेत एकूण 7 तास 57 मिनिटे इतकेच कामकाज झाले. यात लोकसभेत 3 तास 31 मिनिटे, तर राज्यसभेत 4 तास 26 मिनिटे काम झाले. संसदेच्या एका मिनिटाच्या कामकाजासाठी 2 लाख 50 हजार इतका खर्च येतो .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
मुंबई

वॉकहार्ट रुग्णालयातील 3 डॉक्टरसह २६ नर्सना कोरोनाची झाली लागण

मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई सेन्ट्रल परिसरात असलेल्या वॉकहार्ट रुग्णालयातील ३ डॉक्टरांसह तब्बल २६ नर्सना कोरोनाची लागण झाली आहे....
Read More
post-image
विदेश

कोरोनाची लस शोधणारच! बिल गेट्स यांचा निर्धार

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसवर परिणाम करणारी लस विकसित करण्यासाठी मिलिंडा व बिल फाउंडेशन पूर्ण निधी देणार आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक आणि...
Read More
post-image
देश

जयपूरमध्ये अतिउत्साही नागरिकांनी फटाके वाजवले! बंगल्याला भीषण आग

जयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काल रात्री घरातील दिवे बंद करून मेणबत्त्या आणि पणत्या लावण्यास सांगितले होते. मात्र राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील वैशाली...
Read More