संयुक्त राष्ट्रसंघाकडून दहशतवाद्यांची यादी जाहीर, दाऊद, हाफिज सईदचा समावेश – eNavakal
News विदेश

संयुक्त राष्ट्रसंघाकडून दहशतवाद्यांची यादी जाहीर, दाऊद, हाफिज सईदचा समावेश

वॉशिंग्टन – संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी व दहशतवादी संघटनांची यादी आज जाहीर केली आहे. या यादीतील 139 दहशतवादी हे पाकिस्तानमधील असल्याने पाकची नाचक्की झाली असून या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा समावेश आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने जाहीर केलेल्या यादीनुसार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडे असंख्य बनावट पासपोर्ट असून रावळपिंडी आणि कराचीतून हे पासपोर्ट जारी करण्यात आले होते.
कराचीत दाऊदचा बंगला असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत 139 जण पाकिस्तानचे आहेत. यात अल- जवाहिरीचा पहिला नंबर लागला आहे. ओसामा बिन लादेनचा निकटवर्तीय असलेला अयमान अल – जवाहिरी अजूनही अफगाणिस्तान – पाकिस्तान सीमेवर लपून बसल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. याशिवाय सईदच्या दहशतवादी संघटनेचाही या यादीत समावेश आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More