(संपादकीय) हवाई पर्यटनाच्या विपूल संधींकडे दुर्लक्ष – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) हवाई पर्यटनाच्या विपूल संधींकडे दुर्लक्ष

स्वतःकडे असलेल्या साधनसंपत्तीची गुणवत्तेची पुरेशी कल्पना नसली की सगळ्याच बाबतीतला विकास कसा धिम्या गतीने होतो. हे आपल्या देशाच्याबाबतीत तंतोतंत लागू पडते.बुध्दीमत्ता असूनही त्याचे कौशल्यपूर्ण गुणवत्तेत रुपांतर करण्यामध्ये आपण कमी पडतो. किंवा उपलब्ध संधींचे महत्त्व न ओळखल्याने अनेक क्षेत्रात आपण आपलेच नुकसान करून घेत असतो. याउलट जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेने सतत गुणवत्तेचा पुरस्कार केला आणि आपल्या देशातील सेवासंधींचा तितक्याच वेगाने विकासही केला आज अमेरिकेच्या अनेक क्षेत्रातील विकासामध्ये भारतीयांचे बरेच मोठे योगदान आहे. सिलीकॉन व्हॅलीमध्ये भारतीय बुध्दीमत्तेने अशी काही चमक दाखवली ती प्रामुख्याने तिथल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये याच भारतीय गुणवत्तेचे वर्चस्व पाहायला मिळते. भारतात अशी अनेक प्रकारची क्षेत्रे आहेत की जिथे आपल्याच देशातील गुणवत्तेचा परिपूर्ण वापर झाला तर विकासाची कितीतरी मोठी झेप घेता येऊ शकेल. याचे अगदी अलिकडचे उदाहरण द्यायचे तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच पर्यटन क्षेत्राचे देता येते. कारण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामुळे रोजगाराच्या विलक्षण संधी प्राप्त झाल्या आणि लोकांचा जगभरचा प्रवासही वाढला. एकेकाळी भारतासारख्या देशात विमान प्रवास ही अत्यंत चैनीची किंवा श्रीमंती थाटाची गोष्ट वाटत होती ती परिस्थिती आता राहिलेली नाही. गेल्या पाच वर्षामध्ये भारतात विमान वाहतूक क्षेत्र हे प्रचंड वेगाने विस्तारले. साधारण वर्षभरामध्ये जवळपास आठ कोटी लोक विमान प्रवास करीत असतात. परंतु यावर्षीची जानेवारी ते मार्च या काळातील विमान प्रवाशांची संख्या बघितली तर त्यामध्ये आश्चर्यकारक वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी याच काळात तीन कोटी सदतीस लाख विमान प्रवासी होते तर आज याच काळात हीच संख्या तीन कोटी चोपन्न लाखावर जाऊन पोहोचली म्हणजे तब्बल सतरालाखांची भर केवळ तीन महिन्याच्या कालावधीत पडली आहे. विमान प्रवाशांच्या वाढीचा हा वेग भारतातील पर्यटन संधीच्या मुबलकतेची साक्ष देणारा ठरतो. विमानाने प्रवास करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना उपयुक्त ठरेल अशा प्रकारची विमान सेवा आपल्या देशात उपलब्ध नाही. किंबहुना या हवाई क्षेत्राकरीता आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते.

हवाई क्षेत्राकडे दुर्लक्ष

याचा अर्थ असा होतो की जगाच्यादृष्टीने विमान प्रवास किंवा हवाई वाहतूक हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या विमान प्रवासातून किंवा पर्यटनातून मोठ्या प्रमाणावर महसूल उपलब्ध होऊ शकतो. जिथून भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे. त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. यावरून उपलब्ध संधींचा कौशल्यपूर्ण गुणवत्तेसाठी उपयोगही केला जात नाही. आजही देशाच्या प्रमुख महानगरांमध्ये अद्ययावत विमानतळे नाहीत. या सरकारने सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास करता यावा म्हणून उडान नावाची एक स्वतंत्र योजना कार्यान्वित केली ज्यामध्ये अगदी जिल्हा स्तरावर छोटी छोटी विमानतळे बांधून हवाई क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न केला. परंतु याकरीता लागणारी पायाभूत सुविधा उपलब्ध केली गेलेली नाही. अगदी महाराष्ट्रात जवळपास वीस शहरांमध्ये धावपट्टया निर्माण करून छोट्या आकाराची विमानसेवा सुरु करण्याची घोषणा झाली होती. त्यातील एक टक्का सेवासुध्दा सुरु झालेली नाही. शिर्डीसारख्या ठिकाणी देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविक दर्शनासाठी येतात. तिथे विमान सेवा उपलब्ध करून दिली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ होईल. लोकांना काही विशिष्ट शहरांकरीता विमानसेवा हवी आहे यासाठी ते पैसे द्यायलाही तयार आहेत. पण सरकारच्या बेफिकीरीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे विमान पर्यटन हे क्षेत्र विकसित होऊ शकलेले नाही. एवढेच कशाला मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय महानगराबाबत अशाच प्रकारची हेळसांड सुरु आहे. ज्या विमानतळांवरून दर तीन मिनीटांनी एक विमान उड्डाण करते तिथल्या सुधारणा करताना कितीतरी कालावधी वाया घालवला गेला. मुंबई विमानतळावरची ही गर्दी कमी करण्याकरीता नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळांची घोषणा झाली पण ठिकाण निश्चित करता करता दहा वर्षे निघून गेली. पनवेलजवळ ठिकाण निश्चित झाल्यानंतरही पुढच्या पाच वर्षामध्ये हेआंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होणे गरजेचे होते. पण अजूनही त्या कामाला वेग आलेला दिसत नाही.

विमान पर्यटकांची वाढती संख्या

देशाचा विकास ज्या पायाभूत सुविंधांमुळे घडून येतो त्यात रस्ते पाणी वीज या तीन घटकांना महत्त्व असते. रस्ते याचा व्यापक अर्थ असा असतो की सर्व प्रकारची दळणवळण व्यवस्था भक्कम केली पाहिजे. बदलत्या काळानुसार किंवा मागणीनुसार जर विमान प्रवास करणार्‍यांची संख्या वाढली असेल तर त्या संधीचा फायदा उठवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ही गोष्ट खरी आहे की विमानतळांची संख्या वाढत असतानाच शहरांना किंवा खेड्यांना जोडणारे रस्तेदेखील भक्कम झाले पाहिजेत. त्यासाठी योग्य ते नियोजनही झाले पाहिजे. परंतु म्हणून ज्या हवाई पर्यटनाला आज लोक पसंती देत आहेत त्याकडे दुर्लक्ष केले तरी चालेल. ही वृत्ती विकासाला बाधा आणणारी ठरते. आज एकूणच पर्यटन क्षेत्र इतके विस्तारले आहे की नोकरी व्यवसायाशिवाय केवळ विश्रांतीसाठी पर्यटनाला जाणार्‍यांची संख्यादेखील वाढलेली आहे हे सगळे वाढीव विमान प्रवासी अद्ययावत सेवा सुविधांच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रसार, औद्योगिकरण, नागरीकरण त्यात पुन्हा या सरकारने केलेली स्मार्ट सिटीची घोषणा या सगळ्या मुद्दाच्या पार्श्वभूमीवर देशाची अंतर्गत हवाई व्यवस्था आणि एकूणच हवाई क्षेत्र कटाक्षाने विकसित केले पाहिजे ज्यामधून रोजगाराच्या विपूल संधी उपलब्ध होऊ शकतात. आणि त्या त्या विमानतळाच्या परिसरातील भागाचा अनुषंगिक विकास घडू शकतो.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई-पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल इतिहासजमा

पुणे – मुंबई पुण्याला जोडणारा बोरघाटातील अमृतांजन पूल आज रविवारी तोडण्यात आलाय. सध्या करोनामुळे असलेल्या लॉकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याने हे काम करण्यात आले. द्रुतगती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More