(संपादकीय) सबका साथ सबका विकासमधले सत्य  – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश संपादकीय

(संपादकीय) सबका साथ सबका विकासमधले सत्य 

सबका साथ सबका विकास असे म्हणत नरेंद्र मोदींनी देशाचे दुसर्‍यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली पण या सबका साथ सबका विकास या घोषणेचा अनुभव तितक्याच कठोरपणे तपासण्याची आवश्यकता आहे. ऐकायला किंवा  बोलायला गोड वाटणारी ही घोषणा सत्य दडवते की काय असे वाटू लागते. मोदी यांच्या पक्षाला दणदणीत बहुमत मिळाल्याने यासंदर्भातल्या काही कटू गोष्टी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. परंतु सामान्य माणसाच्या मनातील जाणीव व्यक्त झाली पाहिजे. जर सबका साथ सबका विकास ही घोषणा शंभर टक्के प्रत्यक्षात आणायची असेल तर सरकारला आपल्याच निर्णयांची किंवा प्रकल्पांची पुनर्रचना करायला हवी. राज्य किंवा केंद्र सरकारचे असे अनेक निर्णय असतात की ज्यामध्ये सामान्य माणसावर कर्मचार्‍यांवर कामगारांवर अन्याय होताना दिसून येतो. यासाठी फार मोठी उदाहरणे शोधण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या केंद्र सरकारचे नेतृत्व करतात त्या केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या अनेक उपक्रमांमध्ये किंवा प्रकल्पांमध्ये सध्या अस्वस्थता आहे. भारत संचार निगम लिमीटेड, महानगर टेलिफोन निगम लिमीटेड, एअर इंडिया, केंद्राच्या जहाज बांधणी क्षेत्रात येणार्‍या सर्व गोदी या सर्व ठिकाणी सध्या कामगार कपातीचा धडाका चालू आहे. ज्या केंद्र सरकारला आपल्या मालकीचे प्रकल्प वाचवता येत नाहीत किंवा यशस्वी करता येत नाहीत. त्यांनी सबका विकास हा शब्द वापरावा याचे आश्चर्य वाटते. भारत संचार किंवा महानगर टेलिफोन निगम डबघाईला आणून त्यांचा कोणता विकास साधला जाणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु अशा तथाकथित विकासासाठी या अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांची किंवा लोकांची साथ मिळावी अशी मोदी यांची अपेक्षा असेल तर तोसुध्दा एक विचित्र प्रकार म्हणावा लागेल. ज्याठिकाणी केंद्र सरकारने आपली सर्व ताकद पणाला लावून त्या प्रकल्पांचा विकास घडवणे आवश्यक आहे त्याठिकाणी हे प्रकल्प देशोधडीला लावण्याचीच केंद्राची महत्वाकांक्षा दिसून येते. अगदी ढोबळ मानाने जरी हिशोब केला तरी संपूर्ण देशात भारत संचार निगम लिमीटेड, महानगर टेलिफोन निगम किंवा वेगवेगळ्या गोदींमधील किमान पन्नास हजार कर्मचारी आपली नोकरी गमावण्याच्याचिंतेने ग्रासलेले आहेत.

केंद्र सरकारचीच अनेक कार्यालये 

आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हटले जाते. जगभरातल्या अनेक कंपन्या यशस्वी होत आहेत. गडगंज नफा कमावून त्या या स्पर्धेमध्ये यशस्वी होताना दिसतात. परंतु केंद्र सरकारच्या कंपन्या दिवाळखोरीत जाव्यात. यामध्ये कोणता विकास आला. किंवा कोणाचा विकास केंद्र सरकार घडवते आहे हेही स्पष्ट झाले पाहिजे. मतदानामध्ये देशातील अधिकाधिक नागरिकांनी मोदींना साथ दिली आहे. आता या सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षांची किंवा दिलेली साथ लक्षात ठेवून त्यांचाही विकास घडवण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर येऊन पडते. अगदी मुंबईचे उदाहरण द्यायचे झाले तर काही पाणबुड्या आणि युध्दनौकांचे काम मुंबईच्या माझंगाव डॉककडे न देता ते इतर खाजगी कंपन्यांकडे सरकवले गेले आहे. माझंगाव डॉकमधील जवळपास 2800 कामगारांवर यामुळे बेकारीची टांगती तलवार धरली गेली आहे. खाजगी कंपन्यांचे खिसे भरून सामान्य कर्मचार्‍यांना बेरोजगार करणारा हा प्रकार थांबला पाहिजे. माझंगाव डॉक ही एकेकाळी संपूर्ण देशातील अत्याधुनिक आणि आघाडीची जहाजबांधणी करणारी यंत्रणा होती. मधल्या काळात केंद्र सरकारने माझंगाव डॉककडे असलेली बरीचशी कामे बंद केली आणि या प्रतिष्ठित गोदीला उतरती कळा लागली. सरकारी कर्मचारी बेकार करायचे आणि खाजगी कंपन्यांना मालामाल करायचे. हा प्रकार सबका साथ , सबका विकास या घोषणेचा विपर्यास ठरतो. यांसदर्भात केंद्र सरकारने किंबहुना स्वतः नरेंद्र मोदी यांनीसुध्दा आत्मपरीक्षण केले पाहिजे. आधीच रोजगाराची वाईट परिस्थिती असताना बेकारी निर्माण करणारे निर्णय  भविष्यकाळातील धोकादायक परिस्थितीचा इशारा देणारे ठरतात.अगदी एअर इंडियाचीसुध्दा हीच परिस्थिती आहे. सरकारला स्वतःच्या मालकीची एकही विमान कंपनी वाचवता येऊ नये. यामध्ये केंद्र सरकारला कर्मचार्‍यांचीही साथ मिळालेली दिसत नाही. आणि त्यातून कोणाचाही विकास घडवून आणण्याची जिद्दही दिसत नाही.

वाक्याचा प्रभाव आणि अभाव 

या अगदी छोट्या छोट्या उदाहरणांवरून मोदींच्या घोषणेतले सत्य गवसत असेल तर त्याचा लोकांनी आणि त्यांनीदेखील विचार करायला हवा. त्याला आम्ही अगदी विनाश हा अतिरेकी शब्द वापरणार नाही. परंतु अनेक क्षेत्रांमध्ये असलेल्या सामान्य माणसाला नकारात्मक अनुभव येत असतील केवळ तशा परिस्थितीशी सामना करावालागेल. तर ते निश्चितच दुर्दैवी ठरते. निदान दुसर्‍या पाच वर्षामध्ये तरी लोकांना या घोषणेचा प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे. आणि ही घोषणा मोदींनी न देता लोकांकडून दिली गेली पाहिजे. म्हणजेच त्यांना तशा प्रकारचा अनुभव आला पाहिजे. इथपर्यंत ठिक असते की भारतात लोकशाही प्रक्रिया आहे. त्या लोकशाही प्रक्रियेअंतर्गत निवडणुका होतात त्यात कोणत्यातरी एका पक्षाला बहुमत मिळत असते. परंतु बहुमत मिळवणार्‍या पक्षांनी सर्वसाधारण भान ठेवले पाहिजे. आज प्रत्यक्षात काही वेगळे घडत असेल आणि त्याकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय स्वार्थासाठी एकच नारा दिला जात असेल तर तेदेखील अन्यायकारकच म्हणायला हवे. ही तर आम्ही काही ठराविकच उदाहरणे दिली आहेत. या पध्दतीची अक्षरशः शेकडो उदाहरणे आहेत, फक्त त्यांची संख्या तुलनेने कमी आणि ते संघटित नसल्याने ते आपले म्हणणे तितक्या प्रभावीपणे मांडू शकत नाहीत. म्हणूनच घोषणा म्हणून एखादे वाक्य प्रभावशाली वाटत असले तरी त्यामध्ये जर वस्तुस्थितीचा अभाव असेल तर ते लक्षात आणून देण्याची गरज असते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More