(संपादकीय) सक्तीच्या नियुक्तीची तुघलकी शिक्षा – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) सक्तीच्या नियुक्तीची तुघलकी शिक्षा

अनेकवेळेला सरकारी कारभारात अंधेर नगरी चौपट राजा या उक्तीचा अनुभव येत असतो. त्याची शेकडो उदाहरणे देता येऊ शकतात. ज्याप्रमाणे सध्या वाहतूक नियमांमध्ये बदल केला गेला आहे. हजारो रुपये दंड आकारून वाहन चालकांना जेरीस आणण्याचा प्रकार महाराष्ट्रात होऊ घातला आहे. तसाच दुसरा निर्णय आणि तोही आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता जाणवते. अगदी सरकारी दवाखान्यांमध्येसुध्दा डॉक्टर जायला तयार होत नाहीत. याच्यावरचा उपाय म्हणून राज्यमंत्रिमंडळाने एक अचाट कल्पना मांडली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशात त्यातही एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी दहा ते वीस टक्के जागा आरक्षित ठेवायच्या आणि या
दहा ते वीस टक्के कोट्यामध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतील. त्यांना ग्रामीण भागात पाच किंवा साडेसात वर्षे सक्तीने काम करावे लागेल. म्हणजे त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्यांना ग्रामीण भागात काम करण्याचे बंधन राहील. जर त्यांनी त्याला नकार दिला किंवा या नियमाचा त्यांनी भंग केला तर पाच वर्षे कारावासाची शिक्षाही प्रस्तावित केली गेली आहे. ग्रामीण भागातील डॉक्टरांची टंचाई भरून काढण्याकरीता हा एक तुघलकी उपाय शोधला गेला आहे. याबाबतचे विधेयक विधिमंडळात सादर करायला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी असणारी जोरदार स्पर्धा लक्षात घेऊन हा प्रकार सरकारच्या डोक्यात आलेला दिसतो. सध्या जेवढ्या वैद्यकीय प्रवेशाच्या जागा असतात. त्या मिळवण्याकरीता आधीच मारामार असते. त्यात पुन्हा अशा प्रकारचे आरक्षण लागू केल्यानंतर मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. प्रवेश मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थी तयार होतीलही. परंतु त्याच कायद्यातल्या वेगवेगळ्या पळवाटा काढून ते आपला पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करतील की नाही. याबद्दल खात्री देता येणार नाही. कारण सरकारनेच नियुक्त केलेले डॉक्टर ग्रामीण भागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर काम करायला नाखुश असतात. सरकार त्यांच्यावर सक्ती करू शकत नाही. याचा अर्थ ग्रामीण भागात डॉक्टर लोक जायला नाखुश का असतात. याची नीट कारणीमिमांसा केली पाहिजे.

रोगापेक्षा इलाज भयंकर

प्रत्येक गोष्ट कायदा, नियम करून सक्तीची केली म्हणजे आपली जबाबदारी संपली असा राज्यकर्त्यांचा समज दिसतो. परंतु स्वतःच्या बाबतीत कोणतीच सक्ती करून घेतली जात नाही. ग्रामीण भागातील सुविधांचा अभाव हे डॉक्टर तिथे न जाण्यामागचे प्रमुख कारण असते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण वैद्यकीय शिक्षणावर लाखो रुपये खर्च होतात. ते पैसे सत्कारणी लागावेत किंवा त्याचा उपयोग व्हावा. म्हणजेच मनासारखे पैसे कमावता यावेत. हादेखील डॉक्टरांच्या ग्रामीण भागात न जाण्याचे हेसुध्दा कारण असते. थोडक्यात सांगायचे तर ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा किंवा डॉक्टरांची टंचाई याचा अर्थकारणाशी संबंध येतो. कारण त्यांच्याच बरोबरीने डॉक्टरी शिक्षण पूर्ण केलेले लोक शहरामध्ये गडगंज पैसा कमावतात. त्या तुलनेने ग्रामीण भागात राहून पैसे कमावता येत नाहीत. ही त्यांची सर्वात मोठी अडचण आहे. याचा अर्थ डॉक्टरांनी ग्रामीण भागात जाऊन
काही वर्षे राहावे असे जर सरकारला वाटत असेल तर त्यांना सक्ती करण्याऐवजी त्यांच्या पुरेशा उत्पन्नाची हमी सरकारने घ्यायला हवी. शहरी भागात सरकारी रुग्णालयात काम करणार्‍या डॉक्टरांपेक्षा ग्रामीण भागात काम करणार्‍या डॉक्टरांचे मानधन किंवा पगार हा दीडपट किंवा दुप्पट केला तर हेच शहरातले डॉक्टर राजीखुशीने ग्रामीण भागात जाऊन कामही करायला तयार होतील. म्हणजे वैद्यकीय शिक्षणात वेगळे आरक्षण ठेवायचे. त्या आरक्षणानुसार प्रवेश घेतलेल्यांवर लक्ष ठेवायचे आणि ते काटेकोरपणे पाच किंवा सात वर्षे ग्रामीण भागात काम करतात की नाहीत. यावरही देखरेख ठेवायची. हा सगळा द्राविडी प्राणायाम करीत असताना त्यांचे ग्रामीण भागात राहणे हे मनापासून स्वीकारलेले काम राहाणार नाही. ही एक सक्तीची शिक्षा म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाईल. ग्रामीण भागात ज्या आरोग्य सुविधा कायमस्वरुपी रुजाव्यात किंवा उभ्या राहाव्यात हा उद्देश साध्य होणार नाही. अन्यथा रोगापेक्षा इलाज भयंकर असे त्याचे वर्णन करण्याची वेळ येईल.

आमदार खासदारांच्या मुलांना सक्ती करा

मोठ्या कष्टाने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टरीसारखा प्रतिष्ठित व्यवसाय करण्याचे स्वप्न ज्यांनी बाळगले आहे त्यांच्यावर सक्तीची नियुक्ती लादून अन्याय करण्यासारखेच ठरते. समाजातल्या सर्वच घटकांनी कायदा किंवा नियमाप्रमाणे वागावे अशी राजकारण्यांची समजूत आहे. हाच नियम त्यांनी जरा स्वतःला लावून पाहावा. ज्या ग्रामीण भागात डॉक्टर्स जायला नाखुश असतात त्याच खेडोपाडी त्या भागातून निवडून आलेले आमदार खासदारही कधी फिरकत नाहीत. त्या सगळ्यांचे बंगले हे तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्यांची मुले पुण्या मुंबईत किंवा परदेशात शिकायला जातात. एवढेच नव्हे तर अनेक आमदार खासदारांची मुले डॉक्टर होतात पण त्यातला एकही मुलगा आपलाच बाप ज्या मतदार संघातून निवडून येतो तिथल्या खेड्यामध्ये दवाखाना थाटत नाहीत. राज्य सरकारने सामान्य विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू करण्यापूर्वी कोणत्याही लोकप्रतिनिधींची मुले किंवा सनदी अधिकार्‍यांची मुले जर डॉक्टर झाली तर त्यांना याच पध्दतीची सक्ती करून दाखवावी. त्याला काय प्रतिसाद मिळतो यावरून या प्रस्तावित विधेयकातील चूक सरकारच्या लक्षात येईल. मंत्रिमंडळाने अशा प्रकारच्या विधेयकाला मंजुरी दिली म्हणजे पुढच्या वर्षदीड वर्षात याबाबतचे विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा इरादा दिसतो. पण तो हाणून पाडला पाहिजे. सक्तीची नियुक्ती देण्यापेक्षा स्वेच्छेने ग्रामीण भागात जाणार्‍यांना सर्वाधिक मानधन देण्याचे धोरण सरकारने अंगिकारावे. ते जास्त योग्य ठरेल. किंबहुना ज्यामधून ग्रामीण भागाचा आरोग्य विषयक सुविधांचे व्यापक जाळे निर्माण करण्याची व्यवस्थाही आकाराला येऊ शकेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More