(संपादकीय) भारताच्या मुत्सद्देगिरीचे अपूर्व यश – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) भारताच्या मुत्सद्देगिरीचे अपूर्व यश

जम्मू काश्मिरमधील 370कलम हटवण्याच्या विरोधात पाकिस्तानकडून जे जे प्रयत्न होत आहेत त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनकडून काश्मिरविषयक मुद्दा उपस्थित केला गेला. परंतु चीन आणि पाकिस्तान वगळता कोणत्याही देशाने पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे भारताच्यावतीने सुरक्षा परिषदेतले भारताचे प्रतिनिधी असलेले सय्यद अकबरुद्दीन यांनी ज्या पध्दतीने ही भूमिका मांडली तिचा तो प्रभाव म्हणावा लागेल. आंतरराष्ट्रीय कूटनीती किंवा मुत्सद्देगिरीमध्येसुध्दा भारताने आपले लोकशाही तत्व सोडलेले नाही. 370 कलम रद्द केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत एकाकी पडेल किंवा पाकिस्तान पुन्हा हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन भारताची कोंडी करेल असा अनेकांचा समज होता. एवढेच नव्हे तर भारतातील काही राजकीय विरोधकांनाही याची खात्री वाटत होती. परंतु भारताने याबाबतची जी काही व्यूहरचना आखली तीसुध्दा पूर्णपणे यशस्वी ठरली. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारताने सुरक्षा परिषदेत उपस्थित झालेल्या कोणत्याच मुद्दांना बगल दिलेली नाही. उलट वस्तुस्थितीदर्शक भूमिका मांडून सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचे समर्थन मिळवले. प्रामुख्याने भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या सिमला कराराला भारत बांधील आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य अंग आहे. तो पूर्णपणे अंतर्गत प्रश्न असल्याने त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर किंबहुना सुरक्षा परिषदेतही संबंध येत नाही. मानवी हक्कांच्याबाबतीतही भारताकडून ज्या पध्दतीने उत्तर दिले गेले ते ऐकल्याबरोबर सुरक्षा परिषदच काय परंतु देशातील कोणताही देश भारताच्या भूमिकेविषयी संशय घेऊ शकत नाही. ही मुत्सद्देगिरी करताना भारतातर्फे सय्यद अकबरुद्दीन या नावाच्या भारतीयाने भक्कम बाजू मांडावी हाच कितीतरी मोठा विजय ठरतो आणि त्यातला सर्वात महत्वाचा भाग असा की ज्या लोकशाही तत्वांविषयी प्रश्न उपस्थित केले गेले त्याला उत्तर देताना सय्यद अकबरुद्दीन यांनी भारत हा सव्वाशे कोटी लोकसंख्येचा जगातला सर्वात मोठा लोकशाहीवादी देश आहे. तेव्हा आम्हाला मानवी हक्कांविषयी कोणी शिकवण्याची गरज नाही. हे वाक्य भारताच्या लोकशाही तत्वांचे जयघोष करणारेच ठरले.

सय्यद अकबरुद्दीन आणि काश्मीर प्रश्न

सिमला कराराला भारत बांधील आहे हे सांगत असतानाच पाकिस्तानने सर्वप्रथम दहशतवाद थांबवावा आणि मगच बोलणी होऊ शकतात. स्टॉप टेरर टॉक स्टार्टस अशा एका वाक्यामध्ये सय्यद अकबरुद्दीन यांनी भारताची भूमिका मांडली. 1971 साली बांगला देशच्या युध्दानंतर सिमला करार तयार केला. ज्या करारानुसार काश्मिरचा प्रश्न यापुढे केवळ सिमला करारानुसार सुटेल, काश्मिरप्रश्नी ना कुठल्या तिसर्‍या देशाची मध्यस्थी होईल ना तो प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर वादग्रस्त करता येईल. अशा प्रकारचा स्पष्ट करार झाला असताना त्याला बाजूला ठेवून पाकिस्तान काश्मिरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करीत असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की पाकव्याप्त भाग हा पाकिस्तानने भारताला देणे क्रमप्राप्त ठरते. त्यावेळी केवळ अमेरिकेच्या दबावामुळे भारताने आपल्या पश्चिम सीमेवर युध्द केले नाही. सिमला करारात नियंत्रण रेषेचे पालन करण्याचे मान्य केले गेले होते. परंतु त्यालादेखील पाकिस्तानने धाब्यावर बसवले. ही वस्तुस्थिती पाहिली तर सय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला पुन्हा सिमला कराराची आठवण करून देणे किंबहुना जगाच्याही लक्षामध्ये ही गोष्ट आणून देणे तितकीच महत्त्वपूर्ण ठरते. स्वाभाविकपणे कोणत्याच पातळीवर पाकिस्तान काश्मीर मुद्दाचे समर्थन करू शकत नाही आणि आता तर संपूर्ण जगात दहशतवादी देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाकिस्तानला कोणीही खुला पाठिंबा द्यायला तयार नाही. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने आपली बाजू अतिशय भक्कम केलेली आहे. आता फक्त स्थानिक पातळीवर अतिशय सावधानतेने भारताला परिस्थिती हाताळावी लागेल. विशेषतः गेल्या पंधरा दिवसामध्ये काश्मिरमध्ये एकही अनुचित घटना घडली नाही. भलेही संचारबंदी जरी असली तरी एकाही व्यक्तीचा बळी गेलेला नाही. ही गोष्ट लोकशाही, मानवाधिकार या दोन्ही तत्वांना सार्थक करणारी ठरते.

भारतासाठी मोठी संधी

आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक मोठा अडथळा भारताने पार केला. काश्मिरच्या निमित्ताने जागतिक पातळीवर भारतीय लोकशाही मूल्यांचा, मानवाधिकाराच्या तत्वाचा आणि प्रखर दहशतवादविरोधी देश म्हणून भारताची एक नवी प्रतिमा आकाराला येऊ शकते. किंबहुना ती आली पाहिजे. खरे तर कोणताही देश या तीन मूल्यांचे नीट संवर्धन करू शकला तर त्याची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. सगळे जग यावेळी शांततेचे आवाहन करीत असतात त्यावेळी ते आवाहन प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखवण्याचे काम तितक्याच प्रामाणिकपणे करता आले पाहिजे. 370 कलमानंतर तिथे जर व्यवस्थितपणे शांतता प्रस्थापित झाली तर तेसुध्दा अभूतपूर्व जागतिक उदाहरण ठरू शकेल. निदान भारताच्या या प्रयत्नांकरीता सर्वांनीच सर्व प्रकारचे मतभेद विसरून सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी झाले पाहिजे. या प्रश्नाचे राजकारण न करता काश्मिरसारखा स्वर्गीय आनंद देणारा हा प्रदेश भारताचा मुकुटमणी म्हणून पुन्हा सन्मानाने प्रस्थापित करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. जग आपल्या प्रयत्नांना पाठिंबा देत असेल तर सर्व भारतीयांचे ते कर्तव्य ठरते. केवळ कोणतातरी पक्ष सत्तेमध्ये आहे आणि त्याने हा प्रश्न हातात घेतला म्हणून तो राजकीय ठरता कामा नये ही जर राष्ट्रीय आवश्यकता असेल देशाच्या एकात्मतेला , अखंडतेला किंबहुना एकूण मानवी सुरक्षिततेला संवर्धित करणारी असेल तर त्याचे कोणीही राजकारण करता कामा नये आणि ही गोष्ट खरीच आहे की, ज्या देशाने लोकशाही मूल्यांची जपणूक केली. सव्वा कोटी लोकसंख्येला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य बहाल करण्याचा प्रयत्न केला त्या देशाकडून कोणत्याही जमातीवर किंवा प्रदेशावर जुलूम अत्याचार करणे शक्य होणार नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More
post-image
News निवडणूक महाराष्ट्र

विधानसभेसाठी ‘आप’ची 8 जागांची पहिली यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे. आम आदमी पक्षाने आज आठ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. आपचे...
Read More