(संपादकीय) दहशतवादविरोधात त्रिस्तरीय आक्रमक मोहीम – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) दहशतवादविरोधात त्रिस्तरीय आक्रमक मोहीम

काश्मिरमधील दहशतवाद निपटून काढण्यासाठी विविध प्रयत्नांची किंवा उपायांची गरज आहे. लष्करी स्तरावर जम्मू काश्मिरमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा खातमा केला जात आहे. गेल्या दोन दिवसात आठ अतिरेक्यांना कंठस्नान घातले गेले. तर दुसरीकडे फुटीरतावादी म्हणून आतापर्यंत पोसल्या गेलेल्या अनेक नेत्यांचा आणि संघटनांचा बंदोबस्त केला जात आहे. आठ दिवसापूर्वीच इथल्या जमात ए इस्लामी या संघटनेवर बंदी घातली गेली. आणि आता जम्मू काश्मिर लिबरेशन ऑफ फ्रंट या संघटनेच्याही मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. भारताचा अविभाज्य भाग म्हणून काश्मिरचा वारंवार उल्लेख होत राहातो. भारतीय संसदेमध्ये त्याबाबतचे अनेक ठरावही यापूर्वी पारित झालेले आहेत. परंतु याच काश्मिरमध्ये राहून काश्मिर भारतापासून अलग करण्याचे कारस्थान या दोन्ही संघटना आतापर्यंत करत आल्या. आणि त्यांना पोसण्याचा उद्योग आतापर्यंतच्या सरकारांनी केला. परंतु पुलवामा हल्ल्यानंतर या दहशतवाद विरोधी मोहीमेची व्यापकता वाढवली गेली. आणि असे हल्ले जितके पाकिस्तान पुरस्कृत आहेत. तेवढेच ते काश्मिरमधल्या फुटीरतावाद्यांनी साहाय्य केल्यामुळे घडू शकले. यापुढे एकूण तीन स्तरावर दहशतवाद विरोधात उपाययोजना सुरु झाली हे स्पष्ट होते. एक म्हणजे पाकिस्तानला याबाबत धडा शिकवणे त्यांच्याकडून वारंवार प्रयत्न होणार नाहीत. अशा प्रकारची मोहीम राबवणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करणे म्हणजे जिथून दहशतवादाला रसद पुरवली जाते. तिथला बंदोबस्त करणे, तर दुसऱ्या स्तरावर काश्मिरमध्ये स्थानिकांकडून पोसला जाणारा दहशतवाद निपटून काढणे. म्हणजेच जमात ए इस्लामी किंवा जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंटसारख्या फुटीरतावाद्यांची नाकेबंदी करणे. म्हणजेच स्थानिक पातळीवर दहशतवादाला कोणत्याही प्रकारची सहानुभूती मिळणार नाही. अशी व्यवस्था करण्याचे धोरण आखले गेलेले दिसते. तिसऱ्या उपायामध्ये दहशतवादाचा राजकीय कारणासाठी उपयोग होणार नाही. तेव्हा राजकारणाचा बुरखा पांघरून दहशतवाद्यांना अर्थपुरवठा होणार नाही. या गोष्टीवरही आता नजर ठेवली जात आहे. कारण जमात ए इस्लामी या संघटनेकडे जवळपास साठ कोटी संपत्ती होती. हा पैसा वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या देणगीतून गोळा झाला होता. अशी ही काश्मिरमधील दहशतवाद निपजणारी त्रिस्तरी. मोहीम म्हणावी लागेल.

फुटीरतावाद्यांचे लाड बंद

अनेकांना जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंट या संघटनेवर बंदी घातल्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहेपरंतु ज्यांनी या संघटनेचा आपल्या राजकीय हितासाठी उपयोग करून घेतला. त्यांनाच या कारवाईचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. म्हणूनच मेहबूबा मुफ्तीसारख्या नेत्याने आता काश्मिर म्हणजे एक मुक्त तुरुंग झाले असल्याची टीका केली. ही टीकासुध्दा सरकारने सुरु केलेल्या मोहीमेचेच यश म्हणावे लागेल. आतापर्यंत अतिशय बिनधास्तपणे या फुटीरतावाद्यांना पोसण्याचे काम तिथल्या राजकीय नेत्यांनी केले. शिवाय पाकिस्तानकडचा पैसा घेऊन तिथल्या तरूणांची माथी भडकवली गेली. लष्करी जवानांवर दगडफेक करणाऱ्या तरूणांना पाचशे रुपये रोज देण्याचा उद्योग याच संघटनांकडून होत राहिला. आता जेव्हा या नेत्यांच्या आणि संघटनांच्या नाड्या आवळल्या जात आहेत तेव्हा त्यांच्याकडून बरीच धक्कादायक माहिती बाहेर येऊ लागली आहे. म्हणजे पाकिस्तानने पोसलेल्या या बांडगुळांमुळे काश्मिरसारख्या नंदनवनाचीच हानी केली गेली. दुर्दैव असे की अगदी उघडपणाने आणि थेट भारतविरोधी प्रचार आणि प्रसार करणाऱ्या या संघटनांचे आणि नेत्यांचे प्रचंड लाड केले गेले. आतापर्यंत त्यांना सरकारी पैशाने सुरक्षा व्यवस्था पुरवली जात होती. ती आता काढून घेतली गेली आहे. जम्मू काश्मिरचे नेते असल्याचे चित्र निर्माण करून कोणत्याही चर्चेच्यावेळी या फुटीरतावादी नेत्यांना सन्मान आणि त्यांची सगळी बडदास्त ठेवण्याचा प्रकार अगदी केंद्र सरकारकडूनही होत गेला. म्हणजे फुटीरतेची भाषा बोलत असताना सरकारकडूनच त्यांची बडदास्त ठेवली जाण्याचा अफलातून प्रकार जगाच्या पाठीवर फक्त भारतातच घडत असावा. म्हणूनच या कटकारस्थाने करणाऱ्या नेत्यांची आणि संघटनांची बँक खाती गोठवली गेली. तेव्हापासून प्रत्यक्ष काश्मिर खोऱ्यातल्या दगडफेकीच्या घटना कमी झाल्या. कारण स्थानिक पातळीवर फुटीरतावाद पोसत असताना दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न सातत्याने होत राहिला. आता त्याचा कायमचाच बंदोबस्त होत आहे. एकाचवेळी तीन पातळ्यांवर दहशतवादाविरुध्दची ही आक्रमक मोहीम सुरु झाल्याने त्याचे परिणामही दिसू लागले आहेत.

पाकिस्तानपर्यंत पोहचलेली साखळी

गेल्या चाळीस पन्नास वर्षात काश्मिरमधली परिस्थिती अतिशय योजनाबध्दरीतीने अस्थिर करण्याचा प्रयोग या फुटीरतावाद्यांनी केलेला दिसून येतो. तिथला दहशतवाद संपवण्याकरीता राजकीय अंगाने प्रयत्न झाले पाहिजे. असे वातावरणही जाणीवपूर्वक निर्माण केले गेले होते. राजकीय अंगाने म्हणजे या फुटीरतावाद्यांशी सरकारने चर्चा करायची त्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा देऊन त्यांची मनधरणी करायची. जम्मू काश्मिरमध्ये निवडणुका घेऊन लोकांनी निवडून दिलेलेसरकार स्थापन करायचे. त्या सरकारमध्येसुध्दा फुटीरतावाद्यांच्या प्रतिनिधींना प्राधान्य द्यायचे. एकीकडे राजकीय मार्गाने प्रयत्न सुरु असतानाच काश्मिर संदर्भात भारताने पाकिस्तानशी चर्चा केली पाहिजे. असा आग्रह फारुख अब्दुल्लांपासून ते सर्व फुटीरतावाद्यांनी सातत्याने धरायचा. आणि अशा चर्चांमध्ये आम्हालाही स्थान मिळाले पाहिजे. अशी मागणी जमात ए इस्लामी किंवा जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंटने करायची. अशी ही अतिशय योजनाबध्द नीती या सगळ्यांनी आखलेली होती. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना परवेझ मुशर्ऱफ भारतात आले होते. त्यावेळेला त्यांनी काश्मिरविषयक चर्चेच्यावेळी या फुटीरतावाद्यांनाही आमंत्रण द्या असा आग्रह धरला होता. एवढेच नव्हे तर हे फुटीरतावादी स्वातंत्र्य सैनिक आहेत अशा शब्दात मुशर्ऱफ यांनी उल्लेख केला होता. याचा अर्थ काश्मिरमधली ही सगळी फुटीरतावाद्यांची शृंखला कशी पाकपर्यंत जोडली गेलेली होती हे सिध्द होते. म्हणूनच ही शृंखला तोडण्याची आवश्यकता लक्षात घेऊनच जम्मू काश्मिर लिबरेशन फ्रंटच्यासुध्दा मुसक्या आवळणे गरजेचे ठरले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More