(संपादकीय) खडसेंचा राणे होणार – जयश्री खाडिलकर-पांडे – eNavakal
महाराष्ट्र संपादकीय

(संपादकीय) खडसेंचा राणे होणार – जयश्री खाडिलकर-पांडे

भाजपा नेते एकनाथ खडसे हे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत हे आता निश्‍चित झाले आहे. 1989 पासून भाजपाशी एकनिष्ठ राहिलेले एकनाथ खडसे यांनी भावनांच्या आहारी जाऊन हा निर्णय घेतला आहे. माणसाचे मन दुखावले की त्याची बुद्धी काम करेनाशी होते आणि त्यातून आयुष्यावर प्रदीर्घ परिणाम होणारे निर्णय जेव्हा घेतले जातात तेव्हा घातच होतो. एकनाथ खडसे यांच्याबाबतीत हेच होणार आहे. त्यांचा ‘नारायण राणे’ होणार आहे. नारायण राणे हे अत्यंत हुशार आणि तरबेज राजकारणी होते. परंतु पक्ष आपल्यामुळे आहे असा त्यांना भ्रम झाला. त्यातून त्यांची महत्त्वाकांक्षा वाढली. ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नाही हे लक्षात आल्यावर ते अस्वस्थ होत गेले आणि त्यांच्या हातून गंभीर चुका होत गेल्या. हे सर्व घडल्यावर आपण भरकटत चाललो आहोत याची वेळीच जाणीव करून घेऊन राजकारणातून निवृत्त होणे हाच एक सुज्ञ मार्ग असतो. अशा निवृत्तीने सन्मान कायम राहतो. पण हा निर्णय न घेता आणखी चुका करीत गेलो तर आपण अनेकांच्या हातातील बाहुले बनतो. नारायण राणेंच्या बाबतीत हेच झाले आणि आता एकनाथ खडसेंच्या बाबतीत तेच होणार आहे. शिवसेनेवर टिका करण्यापुरता नारायण राणेंचा वापर केला जातो तसा आता फडणवीस आणि भाजपावर टीका करण्यापुरता खडसेंचा वापर केला जाईल. दोघांनाही इतकेच स्थान आहे आणि राहणार आहे. महत्त्वाकांक्षाने दोघा नेत्यांना इतके आंधळे केले की दोघे स्वत: पायी चालत खाईत पडले हे दुर्दैव आहे.

लालकृष्ण आडवाणी हे याबाबतीत उजवे ठरले. भाजपात मोदींचा उदय झाल्यावर आपले स्थान गेले हे त्यांच्या लक्षात आले. काही काळ त्यांनी नाराजी दाखवली. पण त्यांनी प्रचंड संयम राखला. आडवाणींनी ठरवले असते तर त्यांना कोणत्याही पक्षाने स्वीकारले असते. परंतु दुसर्‍या पक्षात नेतृत्त्वाचे स्थान मिळत नाही हे त्यांना पक्के माहीत होते. आपला केवळ वापर करून घेतला जाणार हे वास्तव त्यांनी मान्य केले आणि दोन पावले मागे घेत स्वत:चा सन्मान राखत ‘मार्गदर्शक’ बनले. आजही जनमानसात त्यांच्याबद्दल आदर कायम आहे.

‘एकनाथ खडसे यांच्या संपर्कात अनेक आमदार आहेत’ असे वाक्य जयंत पाटील यांनी उच्चारले. पण या वाक्यात काही दम नाही. नारायण राणेंनीही अशी गर्जना केली होती आणि ज्या काळात त्यांनी गर्जना केली त्या काळात फायली आणि थैल्या वाजवत आमदार फोडण्याची त्यांची ताकदही होती. पण तरीही नारायण राणे कोणतीही किमया करू शकले नाहीत. चार आमदारही फोडू शकले नाहीत. एकनाथ खडसेंचे वर्तुळ तर खानदेशपुरते आहे. ओबीसी नेता म्हणून त्यांनी कधी उभारीच घेतली नाही. ते स्वत:तच मशगूल राहिले. स्वत:चीच पाठ थोपटत राहिले. कार्यकर्त्यांचा गोतावळाही नाही आणि पाठीशी एक गठ्ठा जमावही नाही. खानदेशातील दोन आमदार निवडून आणण्यापलीकडे ताकद कमविण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत जाऊन त्यांना नेतृत्त्वाची संधी मिळेल याची सूतराम शक्यता नाही. फडणवीसांच्या विरोधात बोलत राहणे इतकाच त्यांचा उपयोग आहे आणि काही काळाने तेच तेच बोलत राहिल्याने शब्दांचा प्रभावही पडत नाही. नारायण राणे रोज शिवसेनेच्या विरोधात बोलू लागल्यावर कुणीच त्यांचे ऐकत नाही अशी जी स्थिती आली आहे तीच खडसेंची स्थिती होणार आहे. काही काळ नावापुरते मंत्रिपद मिळाले तर नशीब समजायचे. जयंत पाटील असेही म्हणाले की, खडसे यांच्या पक्षात विकासाच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. दुर्दैव असे की, राष्ट्रवादीतही खडसे यांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. याचे कारण आता राष्ट्रवादीत जे नेते आहेत त्यांचीच स्वप्न पूर्ण झालेली नसल्याने रात्रीचे शपथविधी होत आहेत. त्या रांगेत बाहेरून आलेले खडसे शेवटच्या बाकावर आहेत.

खडसेंनी 2016 साली राजीनामा दिला. म्हणजे गेली दोन वर्षे विचार करून करून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण राणेेंचे उदाहरण समोर असताना हा निर्णय घेतला आणि निर्णय जाहीर करताना ‘फडणवीसांवर नाराजी आहे’ इतकेच कारण दिले. यातून एकच बोध होतो. खडसेंचे मन दुखावले गेले आहे आणि त्यातून त्यांची विचारशक्ती बंद झाली आहे. अशा स्थितीत जे अपेक्षित आहे तेच घडते आहे. चुकीचा निर्णय घेतला गेला आहे आणि खडसे राजकारणाच्या उत्तरार्धात राणेंच्या वाटेने निघाले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र संपादकीय

(संपादकीय) खडसेंचा राणे होणार – जयश्री खाडिलकर-पांडे

भाजपा नेते एकनाथ खडसे हे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत हे आता निश्‍चित झाले आहे. 1989 पासून भाजपाशी एकनिष्ठ राहिलेले एकनाथ खडसे...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती

नागपूर – कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. शिक्षा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस कवरत्ती’, विदेशी पाणबुड्यांना सळो की पळो करणार

नवी दिल्ली – प्रोजेक्ट- 28 अंतर्गत साकारण्यात आलेली संपूर्ण भारतीय बनावटीची ‘आयएनएस कवरत्ती’ INS Kavaratti ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली आहे. लष्करप्रमुख...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 55,838 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 77 लाखांच्या पार

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 55 हजार...
Read More
post-image
कोरोना विदेश

ब्राझीलमध्ये कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू

ब्राझील – जगभरात कोरोनावर लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशात ब्राझीलमध्ये कोरोना लसीची चाचणी करताना एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलच्या आरोग्य...
Read More