संपादकीय : ‘आधुनिक’ पायाभूत सुविधा म्हणजे काय रे भाऊ – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

संपादकीय : ‘आधुनिक’ पायाभूत सुविधा म्हणजे काय रे भाऊ

गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधा हा शब्द इतक्या गुळगुळीत झाला आहे. सामान्य माणसाने पायाभूत सुविधा याचा अर्थ घेताना आपल्या जीवनमानाचा स्तर यानिमित्ताने उंचावेल म्हणजेच रोजगाराच्या संधी वाढून आपल्या महिन्याभराच्या उत्पन्नामध्ये बर्‍यापैकी वाढ होईल. म्हणजेच आपल्या जीवनाचा पाया अधिक मजबूत होईल. अशा प्रकारच्या सुधारणांना त्यांना पायाभूत सुविधा असे गृहित धरले होते परंतु राज्यकर्त्यांच्या दृष्टीने पायाभूत सुविधांचा अर्थ  खूपच वेगळा आहे. रस्ते, पाणी, वीज या तीन मूलभूत सुविधांमध्ये शंभर टक्के सुधारणा घडवून आणणे म्हणजे पायाभूत सुविधा असाही एक समज काही वर्षापूर्वी याच राज्यकर्त्यांनी करून दिला होता. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक नवीनच शब्द प्रचारात आणलेला दिसतो. त्यांनी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरीता सरकार शंभर लाख कोटी खर्च करणार असल्याचे मुंबईत जाहीर केले. त्यांच्या या आधुनिक पायाभूत सुविधांच्या व्याख्येत कशा कशाचा समावेश होतो. हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. परंतु मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पांच्या कामांचे ज्या पध्दतीने उदघाटन केले गेले ते पाहिल्यावर या आधुनिक पायाभूत सुविधा म्हणजेच पंचतारांकित सोयीसुविधा असाच त्याचा अर्थ निघतो. याचा संबंध भारताशी कमी असतो. आणि इंडियाशी जास्त असल्याचे दिसते. ज्या देशाचा सत्तर टक्के भाग ग्रामीण स्वरुपाचा आहे. आज ज्या ग्रामीण भागात धड रस्ते नाहीत. आरोग्य सुविधा नाहीत पिण्याचे पुरेसे स्वच्छ पाणी नाहीत. प्राथमिक शिक्षणाचे अजूनही तीनतेराच वाजलेले आहेत. अशा शेकडो सुविधांचा अभाव असताना त्यांना पायाभूत सुविधा मानले गेलेले दिसत नाही. परंतु बुलेट ट्रेन शहरवासियांसाठीचे मेट्रो प्रकल्प मोठ्या शहरांना जोडणारे समृध्दी मार्ग ठिकठिकाणी उभारले जाणारी विमानतळे किंवा ज्यादा भाडी आकारून दिल्या जाणार्‍या आधुनिक रेल्वे सुविधा या गोष्टी मोदींच्या आधुनिक पाया सुविधांमध्ये गृहित धरलेल्या दिसतात. म्हणूनच सामान्य माणसाला आता या आधुनिक पाया सुविधा म्हणजे काय रे भाऊ असा नवा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे.

मूलभूत जीवनाचे काय

सध्याच्या एकविसाव्या शतकात जगाप्रमाणे आपल्यालाही देशातील शहरांची निर्मिती करावी लागेल. त्या दृष्टीकोनातून आधुनिक पायाभूत सुविधांवर शंभर लाख कोटी रुपये खर्च करण्याची पंतप्रधानांची आधुनिक घोषणा ही केवळ प्रातिनिधिकच म्हणावी लागेल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुढचे काही दिवस घोषणांचा पाऊस पाडला जाईल आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या घोषणा करून मतांचे पीक काढले जाईल आणि मग पुढची पाच वर्ष ही सर्व कामे इतक्या धीम्या गतीने चालतील. की मग 2024 च्या निवडणुकीपूर्वी एकेका कामांची उद्घाटने करून आम्ही कसा विकास घडवून आणला त्याचा डांगोरा पिटला जाईल. थोडक्यात जगाप्रमाणे भारतातील शहरांची निर्मिती करण्यावर भर देण्याचा प्रकार म्हणजेच लोकांना गाजर दाखवून मते ओरबाडण्याची ती शक्यता आहे. एकीकडे पायाभूत सुविधांच्या नावाने ढोल बडवले जात असताना दुसरीकडे सामान्य माणसाच्या जगण्याचे मूलभूत प्रश्न तसेच कायम आहेत. जगाप्रमाणे शहरांची निर्मिती ही माणसांच्या आवश्यकतेप्रमाणे गावागावाचा विकास हे एकदा ठरवले गेले पाहिजे. 2014 साली याच नरेंद्र मोदींनी देशात शंभर स्मार्ट सिटी उभारण्याचे गाजर दाखवले होते. गेल्या पाच वर्षात एकाही स्मार्ट सिटीची पन्नास टक्केसुध्दा निर्मिती होऊ शकली नाही. खरे तर स्मार्ट सिटी कशी असेल याचे एखादे नमुना शहर किंवा मॉडेल त्यांनी पाच वर्षात निर्माण करून दाखवले असते. तर त्याला काही अर्थ उरला असता. परंतु लोकांची विस्मरणशक्ती दांडगी असते. नव्या घोषणा होत राहतात. जुन्या घोषणांचा विसर पडत जातो. आता पुन्हा आधुनिक पायाभूत सुविधांचे बुजगावणे उभारले गेले आहे. जणुकाही पुढच्या पाच वर्षात त्या सगळ्या आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने भारतातील शहरे जागतिक दर्जाची होतील. असादेखील मूलभूत समज निर्माण करून देण्याचा प्रयत्न चाललेला दिसतो. ग्रामीण भागातील सत्तर टक्के समाज इतक्या विचित्र परिस्थितीत जीवन जगतो आहे की त्याला मूलभूत सुविधाच नसल्याने आपण असहाय्य किंवा अपंग असल्याचेच सातत्याने भासत राहते.

स्मार्ट सिटीज नको स्मॉल व्हिलेज हवे

देशाचा शहरी भाग आधुनिक सुविधांनी विकसित करण्याचा हा प्रकार धोकादायक म्हणायला हवा. देशाला आज खर्‍या अर्थाने ग्रामीण विकासाची आवश्यकता आहे. स्मार्टसिटीजपेक्षा ही खेडी स्मॉल सिटीजमध्ये परावर्तित झाली आणि तिथे पायाभूत या शब्दापेक्षाही मूलभूत सोयीसुविधा दिल्या गेल्या तरीसुध्दा राज्यकर्त्यांना विकासाचे सूत्र गवसले असे म्हणता येईल. जगाचा तोंडवळा पाहून स्वतःच्या चेहर्‍याची रंगरंगोटी करण्याची आवश्यकता नाही. भारताने स्वतःचे विकासाचे अदभूत मॉडेल तयार करायला हवे. आणि भारताकडे बघून जगाला मूलभूत विकास कशाला म्हणतात याचे ज्ञान होईल. असे उद्दीष्ट ठेवण्याची गरज आहे. परंतु जगाची व्याख्या इन्फ्रास्ट्रक्चर अशी आहे. भारताची अवस्था फ्रॅक्चर स्वरुपाची आहे. जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या देशाची ओळखच वेगळी आहे. स्वाभाविकपणे त्याच्या गरजा आणि आवश्यकतादेखील पूर्णपणे भिन्न असू शकतात. निवडणुकांच्या निमित्ताने दिला जाणारा हा पायाभूत सुविधांचा नारा लोकाची केवळ दिशाभूल करणारा ठरतो. काही वर्षापूर्वी भाजपाच्याच एका नेत्याने गांधीवादी समाजवाद असा शब्द वापरला होता. यावरून त्यांचा वैचारिक गोंधळ लक्षात आला. गांधीवाद हाच समाजवाद आहे. तो वेगळा समाज असू शकत नाही. किंवा गांधीवादाशी समाजवाद हा शब्दही जोडता येऊ शकत नाही तोच प्रकार पायाभूत सुविधांबाबत आहे. जीवनाचा मूलभूत विचार हेच पायाभूत सुविधांचे उद्दीष्ट असले पाहिजे. त्यात पुन्हा आधुनिक पायाभूत सुविधा असा नवा शब्द वापरून वैचारिक गोंधळाचे नवे प्रदर्शन करण्याची गरज नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More