(संपादकीय) आदर्श लोकशाही अजूनही दूरच आहे – eNavakal
संपादकीय

(संपादकीय) आदर्श लोकशाही अजूनही दूरच आहे

गेले दीड महिना सुरु असलेला निवडणूक प्रचाराचा धुमाकूळ संपला आहे. आता प्रत्येकाला निवडणूक निकालांची प्रतिक्षा असेल. नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही प्रचाराने कोणतीच पातळी ठेवली नाही. एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंसाचार प्रचार काळामध्ये सगळीच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक नीतीमूल्ये खुंटीला टांगून ठेवण्याचा प्रकार म्हणजे लोकशाहीच्या नावाने श्राध्द घालण्यासारखाच ठरतो. एकूणच लोकशाही व्यवस्था त्यामध्ये येणारी निवडणूक प्रक्रिया राजकीय पक्षांचे नेत्यांचे कार्यकर्त्यांचे सर्व प्रकारचे वर्तन अभूतपूर्व पैशांची उधळण या सगळ्या घटना बघितल्यानंतर निवडणूक या प्रकाराबद्दल निष्कर्ष काढायचा झाला तर खूपच निराशाजनक चित्र समोर येते. भारतीय संविधानाला जी निवडणूक प्रक्रिया अभिप्रेत आहे. ती सध्या राबवली जात नाही हे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो कारण ज्यासाठी स्वतंत्रपणे आचारसंहिता लागू करण्याची वेळ येते त्याअर्थी या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनाचार होतो. हेच एकाअर्थी अधोरेखित होते. म्हणजेच निवडणुक या संकल्पनेची गोळाबेरीज करताना एकमेकांमधील अविश्वास असेच त्याचे वर्णन करणे क्रमप्राप्त ठरते. जी भारतीय संस्कृती सभ्यतेच्या बाबतीत विशेष गौरवली जाते. किंवा एकूणच राजकारण, समाजकारण या सगळ्याच गोष्टींमध्ये सभ्यतेला अनन्यसाधारण महत्त्व असायला हवे. दुर्दैवाने गेल्या दीड महिन्यातला निवडणूक प्रचार पाहिल्यानंतर सभ्यता तर हद्दपार झाली होतीच. परंतु लोकांनी किंवा मतदारांनी ज्यांच्यावर आपला विश्वास व्यक्त करावा त्या राजकीय नेत्यांमध्ये एकमेकाविषयी प्रचंड अविश्वास असल्याचे यानिमित्ताने ठळकपणे दिसून आले. अगदी मूलभूत मुद्दाचा जरी विचार केला तरी लोकशाही प्रक्रियेत निवडणुका का घ्याव्या लागतात तर लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी देशाचा राज्यकारभार व्यवस्थितपणे पाहावा सामान्य माणसाच्या समस्या सोडवाव्यात. देशाचा, समाजाचा विकास घडवून आणावा. हे त्यामागचे प्रमुख उद्दीष्ट असते. लोकशाही सत्ताधारी पक्षाच्या चुका लक्षात आणून देण्याकरीता विरोधी पक्षाची आवश्यकता सांगितली गेली आहे. किंबहुना सत्ताधार्‍यांवर वचक ठेवण्याकरीता विरोधी पक्ष अनिवार्य ठरतो. परंतु जर का देशाच्या समाजाच्या विकासासाठीच काम करायचे आहे अशावेळी एकतर चुकाच होऊ नयेत.

मार्शल होण्याची वेळ येते

विरोधी पक्षांचा उपयोग चुकांपेक्षाही सुधारणा घडवून आणण्यासाठी झाला पाहिजे. आणि विरोधी पक्षांच्या या सूचनांचा तितकाच आदरपूर्वक स्वीकार केला पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर सत्ताधारी असोत किंवा विरोधी असोत. दोघेही जर देशाच्या हिताचाच विचार करणारे असतील तर मग दोघांचाही एकमेकांवर विश्वास असला पाहिजे. आणि या दोघांच्याही विश्वासाचा केंद्रबिंदू देश , राष्ट्र, समाज असणे गरजेचे आहे. अशा प्रकारची परिपक्व अवस्था हे उत्तम लोकशाहीचे द्योतक ठरू शकते. खरे तर अशा विश्वासातूनच देशाचा विकास अधिक जलद गतीने होऊ शकतो. निवडणूक हे केवळ माध्यम म्हणून वापरले गेले पाहिजे. अन्य काळामध्ये दोघांच्याही भूमिका पारदर्शक असल्या पाहिजेत. एकमेकांचा सन्मान करणार्‍या असल्या पाहिजेत. परिस्थिती अशी आहे की निवडणुकीनंतरही संसदेच्या सार्वभौम सभागृहातसुध्दा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समन्वय पाहायला मिळत नाही दोघेही एकमेकांचे शत्रू असल्यासारखे एकमेकांवर तुटून पडत असतात. केवळ सभागृहाचे नियम अस्तित्वात असल्यामुळे ते सभागृहात प्रत्यक्ष हाणामारी करीत नाहीत. कधीतरी तोही प्रकार घडतो. आणि म्हणूनच अगदी नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे सभागृहातल्या या सदस्यांना आवरण्याकरीता वेगळे मार्शल्स ठेवावे लागतात.म्हणजे लोकसभा अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली काम करणारे हे मार्शल सभागृहात सदस्यांमध्ये आपापसात काही प्रसंग उद्भवला तर त्यावेळी त्या सदस्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचा उपयोग करावा लागतो. असे मार्शल ठेवण्याची वेळ येते. हाच खरे तर त्या संसदीय सभागृहाचा अपमान म्हणावा लागेल. किंबहुना तिथे निवडून येणार्‍या सदस्यांविषयी कोणतीही खात्री देता येत नाही म्हणूनच अशा प्रकारच्या खबरदारीची वेळ येते. म्हणूनच पुन्हा तोच मुद्दा येतो की लोकांनी विश्वासाने निवडून दिलेले हे संसद सदस्य एकमेकांमध्ये विश्वासाने आणि सभ्यपणाने राहातीलच याची खात्री देता येत नाही किंवा तसा हमखासपणे विश्वास दाखवता येत नाही. अशी जर परिस्थिती असेल तर मग त्या लोकशाही व्यवस्थेला किंवा तिच्या नावाने घडवून आणल्या जाणार्‍या या निवडणॅक प्रक्रियेला कोणता अर्थ उरतो.

तो लोकशाहीचा सुदिन

आज तर परिस्थिती अशी आहे की केवळ अविश्वासच नव्हे तर असभ्यपणा हेदेखील या निवडून येणार्‍या सदस्यांचे अंगभूत वैशिष्टय झालेले आहे. निवडणूक प्रचारामध्ये एकमेकांची भाषा पाहिली तर सामान्य अशिक्षित माणूससुध्दा जास्त सभ्यपणाने वागतो असे म्हणण्याची वेळ येते. ही सर्व अतिशय निराशाजनक आणि खेदजनक परिस्थिती म्हणावी लागेल. परिपक्व किंवा सर्वोत्तम लोकशाहीसाठी ही सर्व लक्षणे अत्यंत गैरलागू ठरतात. ज्या दिवशी कोणत्याही असभ्य भाषेशिवाय किंवा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात म्हणजेच एकमेकांवरील विश्वास असल्याच्या वातावरणात निवडणुका पार पडतील तो खरा लोकशाहीचा सुदिन ठरेल. लोकशाहीचे हे मूल्य किंवा नावलौकिक इतके वाढायला हवे की राज्यकारभार पाहाण्यासाठी देशातल्या कोणत्याही दोन प्रमुख पक्षांना पाच पाच वर्षाच्या दोन कालावधींची संधी दिली गेली पाहिजे. दहावर्षानंतर नाममात्र निवडणूक प्रक्रिया राबवून दुसर्‍या पक्षाने राज्यकारभार केला पाहिजे. कारण दोघांचाही उद्देश देशहित असेल तर त्याच्याकडून गैरकारभार, भ्रष्टाचार होता कामा नये. आपापल्या कालावधीत आपण देशासाठी कसे कार्य केले किंवा लोकांविषयी असलेला कर्तव्यभाव कसा निभावला हीच त्यांच्या कामाची ओळख राहिली पाहिजे. अशा प्रकारची एकमेकांमधील आदराची भावना लोकशाही प्रक्रियेला अधिक मजबूत करेल आणि देशाचा विकास घडवून आणू शकेल. जगाच्या अन्य राष्ट्रांमध्येही निवडणुका होतात. जिथे जिथे वेगवेगळ्या पध्दतीने लोकशाही राबवली जाते तिथे राजकीय पक्षांमध्ये समन्वय आणि विश्वास गरजेचा ठरतो. आज इतकी आदर्श पध्दती नेमकी कुठे आहे हे शोधावे लागेल परंतु ज्या मानवसमुहात आपण राहातो त्या समाजाचेच आदर्श लक्षण म्हणून तशी ती असली पाहिजे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

भाजपाच्या विजयानंतर मोदींनी अडवाणी, जोशींची घेतली भेट

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची...
Read More