संपत्तीच्या वादातून वडिलांची गोळ्या झाडून हत्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

संपत्तीच्या वादातून वडिलांची गोळ्या झाडून हत्या

बारामती – बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष दीपक खोमणे याने आपल्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. शेतजमीन आणि संपत्तीच्या वादातून त्याने ही हत्या केली असून हत्येनंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या.

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथे दीपक खोमणे आणि वडील धनंजय खोमणे (७५) राहायचे. त्यांचा बरेच वर्षांपासून जमिनीचा वाद आहे. हा वाद सुटावा म्हणून अनेकांनी मध्यस्थीही केली. मात्र याला यश आलं नाही. मात्र आज या वादाने टोक गाठलं आणि सकाळीच दीपक खोमणे याने आपल्या वडिलांवर रिवॉल्व्हरने गोळ्या घातल्या. त्यानंतर त्याने स्वतःवर देखील गोळ्या घालून घेतल्या. यामध्ये वडील धनवंतराव खोमणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर,दीपक खोमणे याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे जमिनीच्या वादातून संपूर्ण कुटुंबच उद्धवस्त झाल्याचं दिसत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश महाराष्ट्र

दीड महिन्यांनी पेट्रोल महागले; डिझेलचे दर मात्र स्थिर

नवी दिल्ली – जवळपास ४७ दिवसानंतर आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १२ ते १४ पैशांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी डिझेलच्या दरात कोणतीही वाढ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे बंधू रॉबर्ट यांचे निधन

न्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे बंधू रॉबर्ट ट्रम्प यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#DhoniRaina धोनीसोबतच सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा

मुंबई – भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने स्वातंत्र्य दिनी सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केल्याने जगभरातील क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. मात्र चाहते...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

मै पल दो पल का शायर हूँ…! माही निवृत्त

नवी दिल्ली – गेल्या एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेटप्रेमी महेंद्र सिंह धोनीची मैदानावर वाट पाहत होते. मात्र काल स्वातंत्र्य दिनी सायंकाळी अचानक त्याने आंतरराष्ट्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १,२५४, पुण्यात २,४३२ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ८४ हजार ७५४ वर

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात १२ हजार ६१४ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर ३२२ मृत्यूंची नोंद झाली....
Read More