डोंबिवली – संदप-बेतवडे येथील रुनुवाल ग्रुपच्या गोडाऊनला आज दुपारी 2 च्या सुमारास आग लागली .
डोंबिवली जवळील ग्रामीण भागातील संदप-बेतवड़े येथील रुनवाल या टोलेजंग इमारतीच्या तळमजल्याला असलेल्या बिल्डिंग मटेरिल, पेंट आणि इलेक्ट्रिक सामनाच्या गोडाऊनला भीषण आग लागली.यात तेथील साहित्य आणि अन्य बांधकामाचे साहित्य जळून खाक झाले असून सर्वत्र धुर झाला आहे. घटनास्थळी डोंबिवली फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र गोडाउनच्या बाजूला पत्र्याच्या शेडमुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.