संतप्त महिलांनी सरपंच, उपसरपंचांना पाजले दूषित पाणी – eNavakal
News महाराष्ट्र

संतप्त महिलांनी सरपंच, उपसरपंचांना पाजले दूषित पाणी

अलिबाग- मागील 20 दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणार्‍या कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मारत सरपंच, उपसरपंचांना दूषित पाणी पाजले. अचानक कार्यालयात पोहचलेल्या या महिलांना आवरणे कठीण झाले होते. त्यांनी पाणीटंचाईचा जाब विचारत उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांवर प्रश्नांचा भडीमार केला होता. अखेर ग्रामपंचायतीला आमच्याच हलगर्जीपणामुळे पाणीटंचाई निर्माण झाली असल्याची लेखी कबुली द्यावी लागली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली कुसुंबळे हद्दीतील महिलांनी हे आंदोलन केले.

आजचा दिवस कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांना सत्वपरीक्षा देणारा ठरला. दुपारी 2 वाजताच्या दरम्यान संतप्त महिला दूषित पाण्याच्या बाटल्या घेऊन ग्रामपंचायतीच्या कार्यालयात धडकल्या होत्या. सध्या कुसुंबळे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन जीर्ण झाली असल्याने या परिसरातील कुसंबळे, कातळपाडा, डभेवाडी, काचली, पिटकीरी, कुसुंबळे आदिवासीवाडी, खातविरा या गावातील सुमारे साठेचार हजार ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसाआड जे पाणी येत आहे ते अत्यंत दूषित आहे, असे म्हणणे या महिलांचे आहे.

यासंदर्भात शिवसेनेचे तालुकप्रमुख राजा केणी यांनी बुधवारी जिल्हा परिषद प्रशासनाला लेखी निवेदन देत पाणीपुरवठा सुरळीत करावा व त्याचबरोबर तात्पुरत्या स्वरूपात टँकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु दोन दिवस होऊनही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने येथील महिलांचा संताप अनावर झाला होता. अखेर आज या संतापाने उग्र रूप धारण केले. राजा केणी यांनी निवेदन देताना आंदोलनातून होणार्‍या परिणामाची जबाबदारी जिल्हा परिषदेची असेल, असा इशारा दिला होता. त्यानंतरही सुस्त प्रशासनाने याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती. येथील महिलांनी कशाप्रकारचे दूषित पाणी प्यावे लागत आहे याचा नमुना ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना सादर केला. संतप्त महिलांसमोर अखेर शरणागती पत्करत तात्पुरत्या स्वरुपात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाईल, असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीने देताना ही पाणीटंचाई आमच्या हलगर्जीपणामुळे झाली असल्याची लेखी कबुली दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More