‘संजू’च्या रिलीजनंतरही संजय दत्तचे प्रमोशन – eNavakal
मनोरंजन

‘संजू’च्या रिलीजनंतरही संजय दत्तचे प्रमोशन

मुुंबई – साधारणपणे सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत कलाकार त्या सिनेमाचं प्रमोशन करतात. त्यांच्या करारामध्येही तोपर्यंतच त्यांचा सहभाग नमूद केलेला असतो. पण मित्रासाठी काय पण करणारा अभिनेता संजय दत्त याला अपवाद ठरला. रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘संजू’ हा सिनेमा संजूबाबाच्या जीवनावरच बेतलेला आहे. भारतात तो सर्वाधिक कमाई करणारा तो तिसरा चित्रपट ठरला आहे.

हा सिनेमा येत्या 14 ऑक्टोबरला रविवारी स्टार प्लस वाहिनीवर दाखवला जाणार आहे. या वाहिनीवरील या सिनेमाच्या विशेष प्रोमोमध्ये तो स्वत:हून सहभागी झाला. राजकुमार हिरानी निर्मित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. याबाबत बोलताना संजूबाबाच्या निकटच्या सूत्राने सांगितले, “या प्रोमोचं चित्रीकरण मुंबईतच पार पडले असून त्यात संजय दत्त आपल्या जीवनातील काही अनुभव सांगणार आहे. आता ज्याच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे, त्याच्याच तोंडून त्याची कथा ऐकण्यापेक्षा दुसरं काय चांगलं असू शकतं.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी

मुंबई – ठाण्याच्या सुप्रसिद्ध विवियाना मॉलच्या बाथरूममध्ये धक्कादायक संदेश मिळाला आहे. या बाथरूममध्ये संदेश ठेऊन मुंबईतील लोकप्रिय धार्मिक स्थळ सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं असून विधानसभा निवडणुकीच्या आधीचे शेवटचे अधिवेशन आहे. आज पहिल्याच दिवशी आक्रमक होत विरोधक अधिवेशनात महत्त्वाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

वीरेंद्र कुमार सतराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष! अधिवेशन सुरू

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाला काही तास बाकी राहिले असतानाच विरोधक...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सिंहासनकार अरुण साधू

सिंहासनकार अरुण साधू यांची आज जयंती. त्यांचा जन्म १७ जून १९४१ साली झाला. एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार लिखाण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये...
Read More
post-image
महाराष्ट्र शिक्षण

उन्हाळ्याची सुट्टी संपली! आज शाळेचा पहिला दिवस

मुंबई – उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थी आज शाळेत जाण्यास सज्ज झाले आहेत. विदर्भ वगळता आज १७ जूनपासून राज्यभरातील शाळांमध्ये पहिला तास भरणार आहे. नवा...
Read More