संजय राऊत म्हणतात, ‘रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी…’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

संजय राऊत म्हणतात, ‘रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी…’

मुंबई – भाजपने सत्तास्थापनेसाठी नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचं रात्रभर खलबंत सुरु आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. परंतु मुख्यमंत्री आमचाच असे म्हणणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेण्याचे सुतोवाच दिले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केले आहे. “रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी…,” असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शिवसेना आज सरकार स्थापनेचा दावा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान दुपारी 3 वाजता संजय राऊत दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. संध्याकाळी 6 वाजता सोनिया गांधी आणि संजय राऊत यांची ही भेट होणार आहे. तत्पूर्वी येत्या काही तासात संजय राऊत मुंबईत एक पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पंधरा दिवस उलटले आहेत. बहुमत मिळालेल्या भाजपा-शिवसेना यांचे मुख्यमंत्रीपदावरून बिनसल्याने भाजपाने सरकार स्थापन करण्यास नकार दिला. काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले. आज सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी वेळ देण्यात आलेला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More