संजय जोशींप्रमाणे माझ्याही बनावट सीडींचे वाटप सुरू; प्रवीण तोगडियांचा मोदी सरकारवर नवा आरोप – eNavakal
देश

संजय जोशींप्रमाणे माझ्याही बनावट सीडींचे वाटप सुरू; प्रवीण तोगडियांचा मोदी सरकारवर नवा आरोप

अहमदाबाद – विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. संजय जोशीप्रमाणेच माझीही बनावट अश्लिल सीडी करण्याचा कट रचला जात असल्याचा नवा आरोप तोगडिया यांनी केला. अहमदाबादमधील रूग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांसमोर ही माहिती दिली.

दिल्लीतील ‘पॉलिटिकल बॉस’च्या इशार्‍यावर गुजरात पोलीस माझ्याविरोधात मोठा कट रचत आहेत. या कटात गुन्हे शाखेचे सहआयुक्त जे. के. भट्ट यांचाही समावेश असल्याचे प्रवीण तोगडियांनी म्हटले आहे. ‘गुजरातच्या क्राईम ब्रँचचे ‘कॉन्परन्सी ब्रँच’मध्ये रूपांतर झाले आहे. सहआयुक्त भट्ट यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल्स सार्वजनिक व्हावेत. ते दिल्लीतील ‘पॉलिटिकल बॉस’च्या इशार्‍यावर काम करत आहेत. माझा दावा आहे की, नुकताच त्यांची अनेकवेळा पंतप्रधानांबरोबर चर्चा झाली आहे. मी मित्र नरेंद्र मोदींना विनंती करतो की, त्यांनी क्राईम ब्रँचला कॉन्परन्सी ब्रँच बनवून त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये, असे तोगडिया यांनी यावेळी सांगितले.

गुजरातमधील क्राईम ब्रँच माझ्याविरोधात निवडक व्हिडिओ वाटत आहेत. वृत्त वाहिन्यांना व्हिडिओ पुरवण्यात येत आहे. बनावट सीडी बनवणार्‍याचे नाव मला माहीत आहे, योग्य वेळी त्याचा मी खुलासा करेन. बनावट व्हिडिओ वाहिन्यांवर दाखवण्याचा क्राईम ब्रँचचा डाव आहे, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडियांच्या प्रकरणात आरएसएसने मध्यस्थी करावी, असे निवदेन राष्ट्रपतींना केले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More