संजय काकडे काँग्रेसमध्ये जाणार; पुण्यातून लोकसभा लढवणार – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

संजय काकडे काँग्रेसमध्ये जाणार; पुण्यातून लोकसभा लढवणार

पुणे – भाजपाचे पुण्यातील सहयोगी खासदार संजय काकडे लवकरच काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. स्वतः काकडे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच संजय काकडे पुण्यातून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूकही लढण्याची शक्यता आहे. संजय काकडे म्हणाले की, मागील दोन दिवस मी दिल्लीला होतो. तिथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मी भेटलो. मला काँग्रेस पक्षात काम करायचे आहे, असे त्यांना सांगितले. त्यांनी माझ्या निर्णयाचे स्वागत केले आणि लवकरच मी प्रवेश घेईन, असे त्यांनी जाहीर केले असल्याची माहिती काकडे यांनी दिली.

काकडे पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा त्यागातून निर्माण झाला आहे, अशी माझी धारणा आहे. काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, जो सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन चालतो. त्यामुळे हा पक्ष आपल्यासाठी योग्य राहील म्हणूनच मी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे काकडेंनी सांगितले. यापुढे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जे काही निर्णय घेतील ते मला मान्य राहील, असे देखील काकडे म्हणाले. तसेच मी कोणत्याही पक्षात गेलो तरी माझी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातली  मैत्री कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More