संघर्ष हा माझा सोबतीच आहे! मात्र संघर्षात सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मन अस्वस्थ होते! – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

संघर्ष हा माझा सोबतीच आहे! मात्र संघर्षात सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मन अस्वस्थ होते!

मुंबई – मनसेच्या नांदेड येथील सुनील ईरावार या पदाधिकार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली व त्याने सुसाईड नोटमध्ये राज ठाकरेंना अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करताना राज साहेब मला माफ करा, अशी क्षमा याचना केली होती. या घटनेनंतर राज ठाकरे हे अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक पत्र पोस्ट केले आहे. त्या पत्रात त्यांनी कार्यकर्त्यांना धीर सोडू नका, असे भावनिक आवाहन केले आहे. त्यात ते म्हणतात, ‘संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही. उलट संघर्ष हा माझा सोबती आहे!’

सुनिल ईरावार याने आत्महत्या करताना लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले होते की, ‘राज साहेब मला माफ करा आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टीवर राजकारण होत आहे. माझ्याजवळ दोन्ही नाही!’ त्याबाबत आज राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना एक पत्र पोस्ट केले आहे. त्यात ते म्हणतात, ‘माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र. संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही. उलट तो मला माझा सोबतीच वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचे नाही. वा उतार आला म्हणून विचलित व्हायचे नाही, हे मी शिकलो. पण या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जाते!

‘अरे बाबांनो जात आणि पैशात अडकलेले राजकारण तर आपल्याला बदलायचे आहे. म्हणूनच ९ मार्च २००६ला आपण ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा पक्ष सुरू केला. नवनिर्माणाच्या आपल्या या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात यांच्या दलदलीत अडकलेले निवडणुकीचे राजकारण बदलायचे आहे. म्हणूनच गेली १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही. प्रवाहाच्या उलट होणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते. पण त्यासाठी माझी तयारी आहे. तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ-उतारांनंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळलेली नाही. पैसा, जात असल्या गोष्टींवर मला माझ्या पक्षाचे राजकारण चालवायचे नाही. यश जेव्हा यायचं तेव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्वे सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल. सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की, माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झाले तर एकमेकांशी बोला. लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे, हे विसरू नका. आपला नम्र, राज ठाकरे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश राजकीय

प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा नाही! आर्मी रुग्णालयाची माहिती

मुंबई – देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारीक लक्ष असल्याची माहिती दिल्लीच्या आर्मी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

संघर्ष हा माझा सोबतीच आहे! मात्र संघर्षात सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मन अस्वस्थ होते!

मुंबई – मनसेच्या नांदेड येथील सुनील ईरावार या पदाधिकार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली व त्याने सुसाईड नोटमध्ये राज ठाकरेंना अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करताना राज...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

भगतसिंह कोश्यारींकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त पदभार

पणजी – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त ताबा सोपविण्यात आला आहे. गोवा राज्याचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली झाल्याने...
Read More
post-image
देश

गुजरात सरकारचा मोठा निर्णय; पाच शहरात ७० मजली इमारती

गांधीनगर – गुजरात सरकारने दुबई आणि हॉंगकाँगप्रमाणे गुजरातच्या पाच शहरांमध्ये गगनचुंबी इमारती उभारण्याचे ठरविले आहे. गुजरातच्या गांधीनगर, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश मुंबई

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ

नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एकीकडे पेट्रोलच्या दरात वाढ होत असली तरी...
Read More