संगमनेर – नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात आज रविवारी पहाटे भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने एका बिबट्याला धडक दिली. यात या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. आज पहाटेच्या सुमारास सुमारे दोन वर्षाचा एक नर बिबट्या रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणा-या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाला अपघाताची माहिती दिली.
वनविभागाने बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी या मृत बिबट्याला चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात नेले.या महामार्गावरील चंदनापुरी घाट , डोळासणे , माहुली घाट या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे.
