श्लोका-आकाश अंबानीच्या मेहेंदी सोहळ्यात निक जोनाससह प्रियंकाची हजेरी – eNavakal
आघाडीच्या बातम्या मंत्रालय

श्लोका-आकाश अंबानीच्या मेहेंदी सोहळ्यात निक जोनाससह प्रियंकाची हजेरी

नवी दिल्ली – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने बॉयफ्रेंड निक जोनासह मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीच्या मेहेंदी सोहळ्यात हजेरी लावली होती. प्रियंकाने इन्स्टाग्रामवरून आकाश आणि श्वेतासोबतचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रियंका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोनाससोबत असलेल्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आहे. ते दोघे साखरपुडा करणार असल्याचेही बोलले जात आहे. आकाश अंबानीच्या मेहेंदी सोहळ्यासाठीही ते दोघे प्रियंका चोप्राच्या घराबाहेर एकत्रच कारमध्ये जाताना दिसले होते.

‘मेट गाला २०१७’च्या रेड कार्पेटवर प्रियांका अमेरिकन गायक निक जोनाससोबत आली होती. तेव्हापासून त्यांच्यात मैत्री झाली आणि साधारण वर्षभरानंतर ते दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील एका हॉटेलच्या बाहेर त्या दोघांना एकत्र पाहाण्यात आले. तसेच यावेळी प्रियांकाची आई देखील उपस्थित होती अशी माहिती समोर येत आहे. ‘मेट गाला २०१७’च्या रेड कार्पेटवर भेटल्यानंतर प्रियांका आणि निकमध्ये मैत्री झाली. त्यानंतर बेसबॉलचा सामना, डिनर डेट, निकच्या कुटुंबातील कार्यक्रम आणि त्याच्या मित्रमंडळींसोबतचं गेट टूगेदर अशा अनेकवेळी दोघेही एकत्र दिसले. त्यामुळेच दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

‘देसी गर्ल’चा प्रियकर नेमका आहे तरी कोण ?

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार – अमित शहा

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब केला. देवेंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुमच्याकडे काही काम नसेल तर मीम्स बनवा’, सोनाक्षीचे ट्रोलर्सना उत्तर

मुंबई – कौन बनेगा करोडपती -11 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रामायण या पौराणिक कथेतील प्रश्‍नावरील उत्तराने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागत आहे. सोनाक्षी...
Read More
post-image
लेख

व्हिएतनाम युद्धाविरोधात उभी राहिलेली अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री जेन फोंडा

साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकेची आघाडीची, सुप्रसिद्ध, नामवंत अभिनेत्री जेन फोंडा एका वेगळ्याच कारणासाठी सगळ्या जगभर ओळखली जाते आणि अमेरिकेतील लाखो लोकांकडून तिच्यावर आजही प्रखर टीका...
Read More
post-image
देश

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची मानवंदना

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल...
Read More
post-image
देश

भारत २०२१ पर्यंत पहिल्या भारतीयाला स्वतःच्या रॉकेटमधून अंतराळात पाठवणार

नवी दिल्ली – आज ‘लँडर विक्रम’च्या अवतार कार्याचा शेवटचा दिवस होता. मात्र लँडर विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही. उरली सुरली आशा संपल्यावर इस्त्रो’चे प्रमुख डॉ....
Read More