श्री साईबाबा संस्थानला सहा आठवड्यात नवे विश्वस्त  मंडळ नेमण्याचे आदेश – eNavakal
महाराष्ट्र

श्री साईबाबा संस्थानला सहा आठवड्यात नवे विश्वस्त  मंडळ नेमण्याचे आदेश

नवी दिल्ली : मंदिर न्यासावर विश्वस्त नेमणूक करताना नियमांचे पालन न केल्यामुळे सद्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून सहा आठवड्यात नव्या नियुक्त्या करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य शासनाचे अपील फेटाळले .
सन 2016 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने साईबाबा संस्थानच्या मंजूर 17 विश्वस्त पैकी केवळ 11 विश्वस्त नियुक्त केले 3 शिवसेना आणि 8 भाजप अशी वाटणी झाली होती.
शिवसेनेचे तिघे विश्वस्त एकाही मिटींगला हजर नव्हते त्यामुळे संस्थानच्या अधिनियमातील तरतुदी मुळे अपात्र ठरले. अनेक विश्वस्तनियुक्ती चुकिच्या प्रवर्गातुन झाल्या होत्या,त्यांची अधिनियमाप्रमाणे पात्रता नसताना बेकायदा नियुक्त केल्याची बाबही कोर्टापुढे ठेवण्यात आली ,
संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांची नियुक्ती एकाही प्रवर्गातुन नसल्यामुळे ते अपात्र ठरत होते.. जवळजवळ सर्वच विश्वस्तांवर गुन्ह्यांची नोंद असताना त्यांनी खोटे शपथपत्र दिले कि त्यांच्या वर एक देखील गुन्हा नाही.
संजय काळे यांनी याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती गोळा करून उच्च न्यायालय खडपीठ औरंगाबाद येथे जनहितार्थ याचिका दाखल केली होती न्यायालयाने सर्व आरोप योग्य ठरवून विश्वस्त मंडळाचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले ह्या दाव्यात काळे यांच्यावतीने अड सतिष तळेकर , प्रज्ञा तळेकर किरण नगरकर व अजिंक्य काळे यांनी काम पाहिले.
महाराष्ट्र शासनाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आज याचिकेची अंतिम सुनावणी झाली.सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे अपील खारीज करून शासनाला उच्च न्यायालयाने दिलेल्या निकाला प्रमाणे व अधिनियमातील तरतुदी चे पालन करून नवीन विश्वस्त मंडळ केवळ सहा आठवड्यात नियुक्त करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयात काळे यांच्यावतीने अड प्रज्ञा तळेकर व अड अतुल डक यांनी काम पाहिले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo एम.जे.अकबरांचा प्रिया रमाणी विरोधात खटला

दिल्ली – # MeToo परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.  दिल्ली येथील पटीयाला हाऊस न्यायालयामध्ये त्यांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

दृष्काळाच्या मुद्दयावरून राष्ट्रवादी आक्रमक पालकमत्र्यांना दाखविले काळे झेंडे

नाशिक – दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. पालकमंत्री गिरिष महाजन आज दुष्काळ पाहणीसाठी सटाणा दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू, लालबाग राजासाठी समिती स्थापन

मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेश मंडळावर आता सरकारची नजर राहणार आहे. धर्मादाय आयुक्तांनी लालबागच्या राजासाठी समिती स्थापन केली आहे. गणेशोत्सवाच्या आठ दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

(व्हिडीओ)अव्नीचे ठसे सापडले; तिला मारून भुसा भरतील?

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२२-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाना पाटेकर यांच्याविरोधात पहिला जबाब नोंदविणार

मुंबई – अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील वाद चिघळला असताना या प्रकरणी मुंबई पोलिस सोमवारी प्रमुख साक्षीदार डेजी शाह हिचा...
Read More