श्री विठ्ठल मंदिर समितीच्या अन्नछत्रामुळे भाविकांच्या पोटाला मिळाला आधार – eNavakal
News महाराष्ट्र

श्री विठ्ठल मंदिर समितीच्या अन्नछत्रामुळे भाविकांच्या पोटाला मिळाला आधार

सोलापूर-मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्रव्यापी बंदला आज पंढरपूर येथेही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वच घटकांनी या बंदमध्ये सहभाग घेतल्याने दुकाने, उपहारगृहे पूर्णपणे बंद राहिल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. दरम्यान, नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये, याची दखल घेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने आपले अन्नछत्र आज पूर्णवेळ खुले ठेवून भाविकांच्या पोटाला आधार दिला. या अन्नछत्राचा लाभ सुमारे 5000 हुन अधिक भाविकांनी घेतला.

बुधवारच्या एकादशीच्या निमित्ताने आणि संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरात मोठ्या संख्येने भाविक आले होते. पण आज (गुरुवार) महाराष्ट्र बंदमुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याने अनेक भाविकांना आज आपापल्या गावी परत जाता आले नाही. शिवाय बंदला समाजातील सर्वच थरातून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने शहरातील सर्व दुकाने, उपहारगृहे आज दिवसभर बंदच राहिली. हॉटेल्सबरोबर अन्नपदार्थ विकणार्‍या हातगाडयाही पूर्णपणे बंद झाल्याने परगावाहून आलेल्या भाविकांना चहा-नाश्ताच नाही तर पाणी मिळणेही दुरपास्त झाले.

मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांची ही अडचण लक्षात घेऊन मंदिर समितीने आज पूर्णवेळ अन्नछत्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. एरवी 12 ते 2 या वेळेत सुरू असणारे अन्नछत्र आज जवळपास 4 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहिल्याने, अनेक भाविकांच्या पोटाची उपासमार थांबली. याठिकाणी भाविकांसाठी पाण्यासह जेवण प्रसादाची सोय करण्यात आली होती. याचा लाभ 3 हजारांहून अधिक भाविकांनी घेतला.  मंदिर समितीचे अन्नछत्र सुरू नसते तर आज दुपारी आम्हाला व आमच्या मुलाबाळांना उपाशीच राहावे लागले असते. पण मंदिर समितीच्या या निर्णयामुळे आमच्या पोटाला चांगला आधार मिळाला, अशा सकारात्मक प्रतिक्रिया यावेळी भाविकांनी व्यक्त केल्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

होर्डिंग लावल्याने कोणाला तिकीट मिळत नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा होर्डिंग लावण्याचा सपाटा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या होर्डिंगमुळे...
Read More