श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे की विक्रमसिंघे? – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय विदेश

श्रीलंकेचे पंतप्रधान राजपक्षे की विक्रमसिंघे?

श्रीलंका – श्रीलंकेत राजकीय घडामोडींना नवे वळण आल्याचे दिसते आहे, माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी रानिल विक्रमसिंघे यांना डावलून पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेतली आहेत. पण यूएनपी पक्षाने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने विक्रमसिंघे पायउतार झाले होते.  संसदीय सभापती कारू जयसूर्या यांनी या निवडीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. विक्रमसिंघे हे लोकशाही आणि देशाचे सुशासन मजबूत करतील आणि संसदीय निवडीशिवाय पंतप्रधान  पद निवडता येत नाही, त्यामुळे राष्ट्रपतींद्वारे केलेल्या पंतप्रधानांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


स्थानिक सरकारचा कारभार भोंगळ पद्धतीने चालत असल्याचे स्पष्टीकरण देऊन यूएनपी पक्षाने ने आपली युती मागे घेतली होती. त्यामुळे यूएनपी पक्षाच्या पंतप्रधानांना देखील पाय उतार व्हाव लागले. महिंदा राजपक्षे यांनी राष्ट्रपती सिरीसेना यांच्यासोबत एक फोटो ट्वीट करून ‘पंतप्रधान म्हणून शपथ घेतली’ असा संदेश लिहिला होता. त्यामुळे श्रीलंकेमध्ये राजकीय वादळ चांगलेच गाजले होते. पण संसदीय सभापती कारू जयसूर्या यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते. त्यात ‘संसदीय निवडणूक झाल्याशिवाय पंतप्रधानांना पदावरून काढता किंवा नवीन पंतप्रधान निवडता येत नाही. संसदमध्ये बहुमताने निवडलेला व्यक्तीच पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळू शकतो. असा मजकूर लिहून संसदीय निवडणुकीची मागणी केली. त्यामुळे श्रीलंकेत राष्ट्रपतींनी निवडलेले महिंदा राजपक्षे व रानिल विक्रमसिंघे हे दोन पंतप्रधान असल्याचे चित्र दिसत आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More