श्रीपाद छिंदम पालिकेत हजर झाल्याने संताप – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

श्रीपाद छिंदम पालिकेत हजर झाल्याने संताप

अहमदनगर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपाचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी आज पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या सभेला हजेरी लावताच सर्व नगरसेवकांनी जोरदार गोंधळ माजवत घोषणाबाजी केली. तसेच महासभेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे आजची महासभा तहकूब करण्यात आली असून ती आता उद्या घेतली जाणार आहे.
छिंदम यांनी आपण राजीनामा दिलेला नाही, त्यावर माजी सही नाही, असे सांगत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे छिंदम आज महासभेला हजेरी लावणार हे निश्चित झाले होते.

हजेरी लावण्यासाठी प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे आज छिंदम येणार असल्याने पालिका परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. छिंदमला मागच्या दाराने सभागृहात आणल्यामुळे महापौर सुरेखा कदम यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी महापौरांच्या डोळ्यात आश्रू आले. महासभेत हजेरी लावल्यानंतर पोलिसांनी बंदोबस्तातच छिंदमला सभागृहाबाहेर नेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे आजची महासभा तहकूब करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. आता महापालिकेची सभा उद्या शुक्रवार 3 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

शक्ती मिल बलात्कार प्रकरण! हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यात फाशी नाही, तर बलात्कारात का?

मुंबई- एखाद्याची हत्या करणे अथवा शरीराचा एखादा भाग धडापासुन वेगळा करणे अशा अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षेची तरतूद नाही . त्या मुळे हत्ये पेक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन कोमात

वसई- वसई-विरार महापालिकेच्या नालासोपार्‍यातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड हकनाक सोसावा लागत आहे. नालासोपारा पुर्वेकडील...
Read More
post-image
News विदेश

‘जैश’चे मुख्यालय पाकिस्तानने घेतले ताब्यात

इस्लामाबाद – भारताच्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. मौलाना मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय बहावलपूरमध्ये आहे. पंजाब सरकारने हे मुख्यालय ताब्यात घेतल्याची...
Read More