श्रीदेवीचे पार्थिव अखेर मुंबईत दाखल, मात्र संकट अजून संपलेली नाहीत – eNavakal
News मुंबई

श्रीदेवीचे पार्थिव अखेर मुंबईत दाखल, मात्र संकट अजून संपलेली नाहीत

 मुंबई- अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव आणण्यासाठी निर्माण झालेले अडथळे दूर झाल्याने अखेर आज रात्री त्यांचे पार्थिव मुंबईत दाखल झाले. यावेळी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. श्रीदेवी यांच्या मृत्यूप्रकरणी जे गुढ निर्माण झाले होते ते अद्यापही संपलेले नाही. श्रीदेवी यांची सख्खी बहिण श्रीलता उद्या अंत्यसंस्कारानंतर मोठा गौप्यस्फोट करणार असल्याने त्यांच्या मृत्यूनंतरही संकटे कायम आहेत.
श्रीदेवी यांच्या वडिलांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे आयुष्य आकाशात उडणार्‍या एखाद्या पक्ष्याप्रमाणे होते. मात्र कर्जबाजारी झाल्याने त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची बहिण श्रीलता हिने शेजारी राहणार्‍या एका गृस्थासोबत लग्न केले होते. त्यानंतर श्रीदेवी आणि तिची आई दोघीच राहत होत्या. श्रीदेवी यांच्या आईने केलेली चुकीची गुंतवणुक कायद्याच्या कचाट्यात अडकली होती. ही मालमत्ता सोडवण्यासाठी त्यांनी उर्वरित पैसादेखील खर्च केला आणि त्यामुळे श्रीदेवी यांच्या कुटुंबियांना पै-पैसाठी झगडावे लागले. यातच श्रीदेवी यांची आई आजारी झाली. त्यांना उपचारासाठी इंग्लंडला नेण्यात आले. त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया करूनही त्यांचे निधन झाले.
त्यानंतर श्रीदेवींच्या आयुष्यात बोनी कपूर आले. बोनी कपूर स्वतः मोठ्या कर्जात होते. अशा परिस्थितीत ते श्रीदेवींसोबत फक्त दुःख वाटू शकत होते. आईने सर्व मालमत्ता ही श्रीदेवींच्या नावे केली होती. आईने जेव्हा कागदपत्रांवर स्वाक्षरी केली तेव्हा ती शुद्धीत नसल्याचा दावा श्रीलता यांनी केला होता. मालमत्तेतील अर्धा हिस्सा मिळवण्याकरीता श्रीलता यांनी श्रीदेवीविरोधात कोर्टात धाव घेतली. कोर्टात अजूनही याबाबत खटला सुरू आहे.
दरम्यान, दुबई या ठिकाणी लग्न समारंभासाठी श्रीदेवी त्यांच्या पती आणि मुलीसह गेल्या होत्या. तिथेच त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. हा मृत्यू कार्डिअ‍ॅक अरेस्टने झाल्याची माहिती आधी समोर आली. मात्र फॉरेन्सिक अहवालानुसार हा मृत्यू बाथटबमधील पाण्यात अपघाताने पडल्याने झाल्याचे समोर आले. त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदनही करण्यात आले. तसेच दुबईतील सगळी कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर श्रीदेवी यांचे पार्थिव आज रात्री 9ः30 वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले होते. विमानतळाबाहेर चाहत्यांनी एकच गर्दी केल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. श्रीदेवी यांच्या पार्थिवावर उद्या बुधवारी दुपारी 3ः30 वाजता विलेपार्ले सेवा समाज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब येथे उद्या सकाळी 9.30 ते 12.30 वाजेपर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

ठाणे विभागात वर्षभरात शिवशाहीचे 26 अपघात

ठाणे- प्रवाशांना वाजवी दरात वातानुकुलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाने शिवशाही बस आणल्या तरी एसटीच्या ठाणे विभागातील शिवशाही बसचे वर्षभरात 26 अपघात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात एमआयएमचा मूकमोर्चा आणि धरणे आंदोलन

सोलापूर – गोपालसिंह समिती, सल्पर समिती, रंगनाथ मिश्रा आयोगाने मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या शिफारसी केल्या होत्या. मात्र त्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही. या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या लेख

(वृत्तविहार) नव्या गव्हर्नरांचा कस लागणार

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून शक्तीकांता दास यांची तातडीने निवड केली गेली. कारण पुढच्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेची महत्वाची बैठक होणार आहे त्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचा...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुण्यात आशियाई चित्रपट महोत्सव 24 डिसेंबरपासून सुरू होणार

पुणे- ‘आशय फिल्म क्लब’च्या वतीने आयोजित केलेल्या नववा आशियाई चित्रपट महोत्सव 24 डिसेंबरपासून पुण्यात सुरू होणार आहे. 15 आशियाई देशांमधील 40 पेक्षा जास्त चित्रपटांचा...
Read More