श्रीदेवींचा खून झाला होता! आयपीएस अधिकाऱ्याचा दावा – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

श्रीदेवींचा खून झाला होता! आयपीएस अधिकाऱ्याचा दावा

नवी दिल्ली – बॉलिवूडची ‘चांदनी’अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हा अपघात नसून खून होता, असा खळबळजनक दावा केरळचे डीजीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी केला आहे. सिंह हे केरळ येथे पोलीस महासंचालक (कारागृह) म्हणून कार्यरत आहेत. गुन्हेगारी घटना सोडवण्यात तरबेज अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. डॉ. उमादथन या मित्राच्या हवाल्याने त्यांनी हा दावा केला आहे. उमादथन यांचे अलीकडे निधन झाले.

सिंह यांनी डॉ. उमादथन यांना समर्पित करणारा लेख लिहिताना श्रीदेवींबाबतचा दावा केला आहे. डॉ. उमादथन एक नावाजलेले फॉरेन्सिक सर्जन होते, गंभीर गुन्हे विशेषत: मर्डर मिस्ट्री उलगडण्यात ते ‘उस्ताद’ मानले जात असत. सिंह यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. उमादथन यांना श्रीदेवी यांच्या मृत्यूविषयी एकदा विचारले असता त्यांनी श्रीदेवी यांचा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे म्हटले होते. एका फुटाच्या बाथटबमध्ये मद्यधुंद व्यक्ती बुडू शकत नाही. कुणीतरी जाणूनबुजून बुडवल्याशिवाय बुडणे शक्यच नाही. श्रीदेवी यांच्याबाबतीतही हेच घडले होते. त्यावेळी त्यांच्या खोलीत कुणीतरी अन्य व्यक्तिही होती ज्याने श्रीदेवी यांचे पाय धरून ठेवले आणि मग त्यांचं डोकं पाण्यात बुडवण्यात आलं, अशी माहिती या लेखात सिंह यांनी दिली आहे. ‘केरला कौमुदी’ या केरळच्या वृत्तपत्रात त्यांनी हा लेख लिहिला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीच्या रात्री दुबईतील जुमेरा एमिरेट्स टॉवर्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूने सर्व कलाकारांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक शंकाही उपस्थित करण्यात आल्या. मात्र मद्यप्राशनामुळे श्रीदेवी यांचा तोल गेल्याने त्या बाथटबमध्ये पडल्या आणि बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे फॉरेन्सिक तपासणीतून उघड झाले होते. परंतु आता आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांच्या दाव्यामुळे अनेक प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More