शौचालयांची कामे धीम्या गतीने! पालिकेकडून अधिकार्‍यांना नोटीस – eNavakal
News मुंबई

शौचालयांची कामे धीम्या गतीने! पालिकेकडून अधिकार्‍यांना नोटीस

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत शौचालयाचा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आला आहे. पालिकेने लोकांच्या सोयीसाठी शौचालयांच्या बांधकामांना सुरुवात केली आहे. मात्र अनेक ठिकाणी कंत्राटदारांची नेमणूक करूनही बांधकामांना सुरुवात झालेली नाही. तसेच अनेक ठिकाणी शौचालय पाडून ठेवण्यात आली असून त्यांची कामेही रेंगाळली आहेत. त्यामुळे रहिवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. दरम्यान, कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे काम करून न घेतल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे येत्या पालिका स्थायी समितीत याबाबत चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत सुमारे दिड कोटी जनता राहत असून या नगरीत सुमारे 65 टक्के लोक हे झोपडपट्टीत राहत आहेत. या लोकांना पालिका मुलभूत सेवा सुविधा पुरवत आहे. गोवंडी – मानखुर्द परिसरात सुमारे 99 लाख नागरिक 501 शौचकुपांचा वापर करीत आहेत. 90 टक्के शौचालयांना सिवरेज लाईनची जोडणी झालेली नाही. तसेच 50 टक्के शौचालये मोडकळीस येऊन धोकादायक स्थितीत आहेत. तर 65 टक्के शौचालयांमध्ये पाण्याची सोय नसल्याचेही सर्व्हेे अहवालातून स्पष्ट झाले. सध्या पालिकेने टप्पा 11 अंतर्गत शौचालयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. मात्र अजूनही झोपडपटट्यांसह काही सोसायट्यांमधील शौचालयांतील मल खुल्या नाल्यांमध्ये सोडला जात आहे. यावर स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारवेर धरले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

सीमेवरील तणाव चीनमुळेच! भारत-चीन वादात अमेरिकेचीही उडी

वॉशिंग्टन – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारानंतर अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला होता. आता अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दिला असून व्हाइट हाऊसने या मुद्द्यावरून...
Read More
post-image
महाराष्ट्र

तापी नदीवरील हतनूर धरणाचे 32 दरवाजे अर्धा मीटरने उघडले

जळगाव – मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे भुसावळ तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे 32 दरवाजे अर्धा मीटरने आज सकाळी उघडण्यात आले. सध्या...
Read More
post-image
देश न्यायालय

बाबरी मशिद प्रकरणात उमा भारती लखनौच्या सीबीआय न्यायालयात हजर

लखनौ – भाजपाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती या आज बाबरी मशिद व अयोध्येतील श्री राम जन्मभूमी प्रकरणात लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयात...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात एका रात्रीत आढळले ३८ कोरोना रुग्ण

सातारा – सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार थांबता थांबेना. काल जिल्ह्यात एका रात्रीत तब्बल ३८ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे....
Read More
post-image
देश

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, दसऱ्याला ६० हजारांवर जाणार

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे नवी दिल्लीत सोन्याचा भाव प्रति तोळा ६४७ रुपयांनी वाढून तो ४९,९०८...
Read More