शोषखड्ड्यात पडून ३ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू – eNavakal
अपघात महाराष्ट्र

शोषखड्ड्यात पडून ३ वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू

रत्नागिरी- सांडपाणी सोडण्यासाठी मारण्यात आलेल्या शोषखड्ड्यात पडून ३ वर्षीय बालकांचा दुर्देवी अंत झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथे घडली. हसन खान असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून, तो मुळचा उत्तर प्रदेशातील असून, त्यांचे आई-वडील कामधंद्याच्या निमित्ताने सध्या लवेल येथे वास्तव्यास आहेत.

लवेल परिसरात राहणारी हसन खान याची आई शुक्रवारी काही कामानिमित्त लोटे येथे आली होती. तिच्यासोबत ३ वर्षाचा हसन खान हादेखील होता. लोटे एसटी थांब्याच्या मागे खेळत असताना हसन खान हा हॉटेल आमंत्रण आणि यमुना स्वीट मार्ट यांनी सांडपाणी सोडण्यासाठी मारलेल्या शोषखड्ड्यात पडला. तो ज्यावेळी खड्ड्यात पडला, त्यावेळी आजुबाजुला कोणीच नसल्याने, ही घटना कुणाच्याच लक्षात आली नाही. त्यामुळे शोषखड्ड्यातील पाण्यामध्ये गुदमरुन त्याचा मृत्यू झाला.  या दुर्देवी घटनेची खबर लोटे येथील पोलीस चौकीत कार्यरत असलेल्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शोषखड्ड्यात पडून मृत झालेल्या हसन याच्या मृतदेहाचा पंचनामा करुन तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालायत पाठविण्यात आला. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More
post-image
News मुंबई

एसआरए पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत येणार

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार्‍या पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय शासनाच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. अशी माहिती वाद्रे येथील...
Read More
post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More