शोभा डे यांनी लठ्ठपणावरून खिल्ली उडवलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्याने केले वजन कमी – eNavakal
News मुंबई

शोभा डे यांनी लठ्ठपणावरून खिल्ली उडवलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्याने केले वजन कमी

मुंबई – स्तंभलेखिका शोभा डे यांनी ट्विट करुन केलेल्या अपमानाचा चांगलाच फायदा मध्य प्रदेशातील लठ्ठ पोलीस अधिकारी दौलतराम जोगावत यांना झाला आहे. कारण गेल्या वर्षी डे यांनी ट्विट केल्यानंतर जोगावत यांनी वजन कमी करण्याचं मनावर घेतलं. इतकंच नाही तर त्यांनी मुंबई गाठून वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ज्यामुळे जोगावत आता 180 किलोवरुन थेट 115 किलोवर आलेत. त्यांनी एकूण 65 किलो वजन घटवलं आहे. इतकंच नाही तर डाएट आणि व्यायाम करुन अजून 30 किलो वजन कमी करण्याचं लक्ष्य दौलतराम जोगावत यांनी ठेवलंय.मुफज्जल लकडावाला यांनी जोगावत यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली हे विशेष. मुंबईतील सैफी रुग्णालयात जोगावत यांच्यावर गॅस्ट्रिक बायपास प्रोसिजर झाली. या सगळ्या प्रकारानंतर जोगावत यांनी शोभा डे यांचे आभार मानलेत. त्यांनी ट्विट केल्यामुळेच वजन कमी करण्याचा आपण गांभीर्यानं विचार केला, असं जोगावत म्हणाले. इतकंच नाही तर आणखी 30 किलो वजन कमी केल्यावर मी शोभा डे यांना नक्की भेटेन असंही ते म्हणाले. सध्या जोगावत मध्य प्रदेशातील नीमच शहरातील कंट्रोल रुममध्ये तैनात आहेत. ते पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होतील. पुढील दीड वर्ष जोगावत यांना लिक्वीड डाएट देण्यात येणार आहे. त्यानुसार दौलतराम यांचं वजन शंभर किलोने कमी करण्याचा प्रयत्न असेल. सोबतच त्यांचा रक्तदाब आणि मधुमेहही नियंत्रणात येणार आहे. जोगावत यांच्यावर मोफत उपचार होणार आहेत. मध्य प्रदेश सरकारची इच्छा असल्यास, ते हा खर्च उचलू शकतात, मात्र दौलतराम यांच्याकडून एकही पैसा घेतला जाणार नसल्याचं सैफी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री उद्धवनीच व्हावे! शरद पवारांची मागणी! उद्धवजी तत्वत: तयार! संजय राऊतांची घोषणा

मुंबई – महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे, त्यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे, अशी महाआघाडीतील सर्वच पक्षांची मागणी आहे, असे प्रथमच खुद्द शरद पवार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांना अखेरचा निरोप

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांचे निधन

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षऱ्या

मुंबई – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. तसेच आता विधीमंडळातील गटनेता बैठकीसाठी...
Read More
post-image
महाराष्ट्र

खाडिलकरांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज मंडळी दाखल

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील खाडिलकर...
Read More