शोभा डे परत वादात, राज्यपालांना ‘चमचा’ म्हणून संबोधले – eNavakal
News निवडणूक

शोभा डे परत वादात, राज्यपालांना ‘चमचा’ म्हणून संबोधले

मुंबई – शोभा डे या नेहमीच त्यांच्या वादग्रस्त ट्विट्स आणि वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात राहिल्या आहेत. कालच जाहीर झालेल्या कर्नाटकाच्या निवडुकीकच्या निकालावर ट्विट करत त्यांनी एका नव्या वादाला सुरुवात केली आहे. निकालानंतर सत्ता स्थापनेसारखा महत्वाचा निर्णय चमचा राज्यपालास का देण्यात आला आहे असा सवाल शोभा डे यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकात सुरु असलेल्या सत्ता संघर्षाला राज्यपालांच्या निर्णयाने पूर्ण विराम मिळणार आहे . तरी राज्यपालांनी अजून कोणालाही सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले नाही आहे.

१०४ जागांसह कर्नाटकात भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. तर जेडीएस (३७) आणि दुसरीकडे काँग्रेस (७४) या दोघांनी आघाडी स्थापन करत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. परंतु, राज्यपालांनी अद्याप सत्ता स्थापनेवर मौन बाळगला आहे. राजकीय कोंडी सुटणार की आणखी तिढा निर्माण होणार याचीच सर्वांना उत्सुकता निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर शोभा डेंनी राज्यपालांना ‘चमचा राज्यपाल’ म्हणून संबोधले आहे.
या नंतर शोभा डे ने “कर्नाटकात किती घोडे खरेदी केले आणि विकले, असा खोचक सवाल करत कृपया, मला त्यांचे फोन नंबर आणि नावे सांगा, ” असे खोचक ट्विट करत ट्विटर वर नव्या वादाला त्यांनी सुरुवात केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More