शेन वॉर्नच्या उपस्थितीमुळे चांगली कामगिरी करू शकलो – कुलदीप यादव – eNavakal
क्रीडा देश

शेन वॉर्नच्या उपस्थितीमुळे चांगली कामगिरी करू शकलो – कुलदीप यादव

कोलकाता

राजस्थानविरूद्धच्या आयपीएल लढतीत यजमान कोलकाता संघाने 6 गडी राखून सहज विजय मिळविला तो त्यांचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या सुरेख गोलंदाजीमुळे त्याने प्रथमच यंदाच्या या
स्पर्धेत 4 बळी घेऊन कोलकात्याच्या विजयात मोठी भूमिका बजावली. आगोदरच्या सामन्यात विशेष प्रभाव न पाडू शकलेल्या यादवने या सामन्यात मात्र सुरेख गोलंदाजी करताना राजस्थानचा महत्त्वाचे फलंदाज बाद केले. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज आणि माजी कर्णधार शेन वॉर्न या सामन्याला उपस्थित होता. त्याच्या उपस्थितीमुळे आपल्याला नवी ऊर्जा गोलंदाजी करताना मिळाली. तसेच नवा हुरूप वॉर्नच्या उपस्थितीमुळे मिळाल्याचे कुलदीप यादवने सांगितले. धडाकेबाज सुरुवातीनंतर राजस्थानच्या फलंदाजीला यादवने अचूक दिशा आणि टप्प्यावर वेसण घातले. वॉर्नच्या उपस्थितीत आपण चांगली कामगिरी करू शकलो, याचा आपल्याला जास्त आनंद होत असल्याचे सामनावीर पुरस्कार मिळविणार्‍या यादवने सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

लातूरात वाळू तस्करांवर 13 लाखांची दंडात्मक कारवाई

लातूर- मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करावर लातूर तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये नऊ वाहने जप्त करीत तब्बल 13 लाखांचा दंड वसूल करण्यात...
Read More
post-image
News देश

तुंगनाथ तीर्थक्षेत्र लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार

रुद्रप्रयाग – रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तृतीय केदार तुंगनाथ तीर्थक्षेत्रही लवकरच विद्युत रोषणाईने झळाळणार आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो पर्यटक येतात. यासोबतच क्रौंच पर्वतावरील कार्तिक स्वामींचे मंदिरदेखील झळाळणार...
Read More
post-image
News देश

नवी दिल्ली-चंदिगढ रेल्वे प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी...
Read More
post-image
News देश

राफेल विमान खरेदी! राहुल गांधी आज करणार नेत्यांशी चर्चा

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चालू असलेले राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. या मुद्यावरुन भाजपाला घेरण्यासाठी आज राहुल गांधी या विषयासंदर्भात...
Read More
post-image
क्रीडा

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार – श्रीजेश

जकार्ता – आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार श्रीजेशने व्यक्त केले. स्पर्धेपूर्वी आज...
Read More