शेन वॉर्नचे राजस्थान संघात ‘कमबॅक’ – eNavakal
क्रीडा देश

शेन वॉर्नचे राजस्थान संघात ‘कमबॅक’

जयपूर -ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बुजुर्ग फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने यंदाच्या आयपीएल मोसमात पुन्हा एकदा राजस्थान संघात कमबॅक केले असून तो आता राजस्थान संघासाठी मेन्टॉर्नची भूमिका बजावणार आहे. 48 वर्षीय वॉर्नने 2008 मध्ये या पहिल्या स्पर्धेत राजस्थानला जेतेपदाचा मान मिळवून दिला होता. त्यावेळी तो संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक अशा दुहेरी भूमिकेत होता. दोन वर्षांच्या बंदीनंतर राजस्थान संघ यंदा पुन्हा आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. 2008 ते 2011 दरम्यान तो राजस्थान संघाचा कर्णधार होता. त्याने 52 सामन्यात 56 बळी घेतले होते. वॉर्नसोबत मुंबईचा माजी रणजीवीर झुबिन भरूचादेखील संघप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. आपल्या नव्या जबाबदारीबद्दल वॉर्नने आनंद व्यक्त केला असून आपल्या मेंटॉर भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू, असे त्याने सांगितले. राजस्थान संघात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथ आणि मुंबईकर अजिंक्य राहणेचादेखील समावेश आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

सावत्र मुलीवर अत्याचार करणार्‍या पित्याला अटक

ठाणे,- भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देत आपल्याच अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार करणार्‍या 42 वर्षीय नराधम पित्याला कासारवडवली पोलिसांनी आज सकाळी बेड्या ठोकल्या. हा नराधम...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ठाण्यात हुक्का पार्लर, अनधिकृत बॅनर्स-होर्डिंग्जवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

ठाणे -शहरातील हुक्का पार्लर तसेच अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज दिले. महापालिका मुख्यालयात अधिकार्‍यांच्या आणि...
Read More
post-image
News मुंबई

राज्यभरात 316 बेकायदा स्कूल बसवर कारवाई! पंधरा दिवसात दोन लाखांचा दंड वसूल

मुंबई- पुरेशी आसने नसतानाही विद्यार्थ्यांना गाडीत कोंबून त्यांची शाळेत ने आण करणार्‍या बेकायदा स्कूलबस विरोधात राज्य सरकारने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. 1 ते 15...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या

कोलकात्यात एलफिस्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती, चेंगराचेंगरीत २ ठार

कोलकाता – मुंबईत २९ सप्टेंबर २०१७ रोजी एल्फिन्स्टन स्टेशनच्या पादचारी पुलावर अशाचप्रकारे चेंगराचेंगरी होऊन त्यात २३ जणांचा मृत्यू झाला होता. अश्याच प्रकारची घटना आज सायंकाळी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

माझी पत्नी बांधील नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई – मुंबई गोवा क्रुझवर मिसेस फडणवीस यांनी घेतलेल्या सेल्फीमुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या...
Read More