आंदोलन महाराष्ट्र

शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई -आग्रा महामार्गावर आंदोलन

नाशिक – कांदयासह सर्वच शेती मालाला शासनाने तातडीने हमीभाव द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने आज मालेगाव जवळील उमराणे शिवारातील मुंबई – आग्रा महामार्ग रोखून धरला. यावेळी सर्वच शेतकऱ्यांनी गळ्यात कांदयाच्या माळा घालत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध केला. शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केल्याने मुंबई – आग्रा महामार्गावरील वाहतूक कोलमडून पडली होती.
केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातमूल्य पुर्णतः रद्द करूनही कांद्याच्या भावात सुधारणा होत नाही. कांद्याच्या भावाने तळ गाठत्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. कांदयाबरोबरच इतर शेतीमालाच्याही भावात सतत घसरण सुरूच आहे. अनेकदा मागणी करूनही केंद्र शासन शेतीमालाला हमीभाव देत नाही. त्यातून संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज उमराणे बाजार समिती समोरिल महामार्गावर जोरदार ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत शिरसाठ, भारती पवार, नूतन आहेर, प्रेरणा बलकवडे, रामा पाटील, राजेंद्र जाधव, जगदीश पवार, योगेश आहेर, सुनिल आहेर या शेतकरी नेत्यांसह शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला होता. यावेळी गळ्यात कांदयाच्या माळा घालत शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या शेती विषयक धोरणाचा जोरदार निषेध केला

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
क्रीडा

मुंबई पराभवाचा बदला घेणार का?

मुंबई – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या वानखेडे स्टेडियम वर होणार्‍या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई संघ आपल्या मागील पराभवाचा बदला घेणार का? याबाबत मुंबईच्या...
Read More
post-image
क्रीडा

पंजाबने पुन्हा केली दिल्लीवर यशस्वी स्वारी

नवी दिल्ली- आर अश्विनच्या पंजाब संघाने आज येथे झालेल्या आयपीएल स्पर्धेतील परतीच्या लढतीत पुन्हा एकदा दिल्लीवर यशस्वी स्वारी केली. दिल्लीच्या घरच्या मैदानात झालेल्या या...
Read More
post-image
क्रीडा

ज्योत्स्नाचा निकोलवर सनसनाटी विजय

इल गुव्हाना – भारताची स्टार महिला स्क्वॉशपटू ज्योत्स्ना चिनप्पाने येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत जागतिक क्रमवारीत माजी अव्वल क्रमांकावर असलेल्या मलेशियाचा निकोल डेव्हिडचा सनसनाटी...
Read More
post-image
क्रीडा

रैनाने पुन्हा विराटला मागे टाकले

हैदराबाद – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सुरेश रैनाने पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकून सर्वाधिक धावांचा विक्रम आपला नावावर लावला. हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात...
Read More
post-image
News मुंबई

बेकायदा बांधकामांना मालमत्ता कर रक्कमेच्या दुप्पट दंड

मुंबई –  मुंबईतील अनधिकृत बांधकामांवरील दंड आकारणीबाबत राज्यातील सर्व महापालिकांमध्ये एक वाक्यता असावी. अल्प उत्पन्न गटातील घटकांना न्याय मिळावा, म्हणून शासनाने अध्यादेश जारी केला...
Read More