शेतात आढळला अतिदुर्मीळ हरणटोळ जातीचा साप – eNavakal
News ट्रेंडिंग पर्यावरण मुंबई शेती

शेतात आढळला अतिदुर्मीळ हरणटोळ जातीचा साप

वाशिम – केकतउमरा या गावातील दीपक पायघन यांच्या शेतातील एका झुडूपावर हरणटोळ प्रजातीचा साप आढळून आला. दरम्यान, ‘वॉईल्ड लाईफ रेस्क्यू ग्रुप’च्या सर्पमित्रांनी या सापाला पकडून अनुकूल तथा सुरक्षितस्थळी सोडून दिले.
शेतातील एका छोट्या झुडूपावर साप दिसून येताच दीपक पायघन यांनी सर्पमित्रांना भ्रमणध्वनीवरून त्याची माहिती दिली. दरम्यान, सर्वेश फुलऊंबरकर, आकाश रत्ने, मो. समीर, रवि राठोड यांनी तत्काळ पायघन यांच्या शेताकडे धाव घेऊन निमविषारी हरणटोळ या सापास जीवंत ताब्यात घेतले. शेताला लागूनच एकबुर्जी सिंचन प्रकल्प असल्याने हा साप तेथूनच आला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला. हरणटोळ हा साप वाशिममध्ये पहिल्यांदाच आढळला असून तो अत्यंत दुर्मिळ असल्याची माहिती सर्पमित्र सर्वेश फुलऊंबरकर यांनी दिली. महेश इंगळे यांनी दिली. पवन पाटील, संदिप गावंडे, पवन पाईकराव आदिंनी याकामी पुढाकार घेतला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत.यापैकी बहुतांश तेलंगणाचे रहिवासी आहेत. या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More