शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ठाण्यात मनसेचा एल्गार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ठाण्यात मनसेचा एल्गार

ठाणे – शासनाबद्दल शेतकर्‍यांचा रोष व्यक्त करण्यासाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीकरता 100 गाळे मिळावेत या आणि अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ठाण्यामध्ये जोरदार मोर्चा काढत शक्तिप्रदर्शन केले.

भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये पदपथावर उभारलेल्या आंबा विक्री केंद्रावरून झालेल्या वादानंतर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. सुरुवातीस हा मोर्चा महापालिका कार्यालयावर नेला जाणार होता. मात्र नंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. गावदेवी मैदानापासून सुरू झालेला हा मोर्चा राम मारूती रोड, तलावपाळी, कोर्टनाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तसेच ठाणे, मराठवाडा येथील कार्यकत्यार्र्ंसह कोकणातील भाजीपाला, आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. महिलांचीही उपस्थिती या मोर्चात लक्षणीय होती. शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठ मिळावी अशा आशयाचे फलक आणि मनसेचे झेंडे हाती घेत मोर्चेेकरी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
जिल्हाधिकार्‍यांना यावेळी मोर्चातील शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं एक निवेदन दिलं.  आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी  महापालिका क्षेत्रात 100 स्टॉल्स महापालिकेनं उपलब्ध करून द्यावेत. संबंधित शेतकर्‍यांकडे 20 हजार रुपये हफ्ता मागणार्‍यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह इतर काही नेते आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
काय आहे नेमकं प्रकरण ?

ठाण्यात ९ मे रोजी मनसेने त्यांच्या कार्यालयाबाहेर आंबा विक्रीसाठी एका शेतकरी कुटुंबियांना स्टॉल लावू दिला. रत्नागिरीहून आलेल्या शेतकऱ्याने लावलेला हा स्टॉल अनधिकृत असल्याचं सांगत भाजपाने हा स्टॉल हटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर मनसे आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आजपासून पुणे परिवहनच्या बसेसचा सीएनजी पुरवठा बंद

पुणे – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)चा पुरवठा आज 24 मे पासून बंद करण्याचा निर्णय घेतला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलीक्सच्या असांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल

वॉशिंटन – अमेरिकेने विकिलीक्सचे प्रकाशक जूलियन असांजेवर गुप्‍त माहिती अधिनियम अतंर्गत 17 नवे आरोप लावले आहेत. अमेरिकेने युकेकडून असांजेच्या प्रत्यापर्णणाची मागणी केली आहे. लंडनच्या बेलमार्श...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More