शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा तूर्तास स्थगित; उद्या चर्चा – eNavakal
आघाडीच्या बातम्या आंदोलन महाराष्ट्र

शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा तूर्तास स्थगित; उद्या चर्चा

मुंबई – गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात यासाठी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शेतकर्‍यांनी अर्धनग्न मोर्चा काढला. मात्र हा मोर्चा पोलिसांनी मानखुर्दजवळ अडवून धरल्याने मोर्चेकर्‍यांत संताप उफाळून आला आहे. याची दखल घेत उद्योेगमंत्र्यांनी उद्या सकाळी 11 वाजता मंत्रालयात मोर्चेकर्‍यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून या बैठकीत तोडगा निघाला नाही तर जलसमाधी घेण्याचा इशारा मोर्चेकर्‍यांनी दिला आहे.

एमआयडीसीच्या भूसंपादनासाठी घेतलेल्या आमच्या जमिनीचा मोबदला अद्याप दिला नसून ज्यासाठी जमिनी घेतल्या तो प्रकल्प देखील पूर्ण केला नाही. मागील दहा वर्षांपासून आम्ही लढत आहोत. मात्र आमच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोपही शेतकर्‍यांनी केला आहे. 2008 पासून शेतकर्‍यांच्या या जमिनीच्या समस्येचे प्रकरण प्रलंबित आहे. मात्र अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. दिशाभूल करून फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. 2011 आणि 2012 साली मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी आपली व्यथा मांडली होती. परंतु तरीही त्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत. सरकारकडून आश्वासनाचे फक्त गजर दाखवत आहे. न्याय मिळाला नाही तर सामूहिक समाधी घेण्याचा इशारा शेतकरी संघटना व किसान मंचचे सातारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी दिला आहे. दरम्यान, जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील केसुर्डी, धनगरवाडी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, मावशी, मोर्वे, भादे, अहिरे या गावातील शेतकरी मुंबईच्या वेशीवर येऊन आज धडकले आहेत. मात्र वाहतूक कोंडीचे करण देत पोलिसांनी त्यांचा मोर्चा मानखुर्द येथेच अडवला. उद्या सोमवारी हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कळंबोलीत बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा संशयीत सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबई- कळंबोलीमध्ये सापडलेल्या बॉम्बसदृष्य वस्तूचा काल मध्यरात्री रोडपाली परिसरामध्ये स्फोट घडविण्यात आला. सिमेंटच्या बॉक्समध्ये सापडलेल्या सर्व वस्तू तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. शाळेसमोर बॉम्बसदृष्य...
Read More
post-image
News देश

केंद्राने 15 भ्रष्ट आणि कामचुकार अधिकार्‍यांना दाखवला घरचा रस्ता

नवी दिल्ली-  मोदी सरकारच्या कामकाजाला सुरुवात होऊन अजून एक महिना झालेला नाही. तोच सरकारने कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आयकर विभागानंतर केंद्र सरकारने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More