शेतकर्‍यांवर लाठीहल्ला करणार्‍या सरकारने आमच्या गावात येऊ नये – eNavakal
News देश

शेतकर्‍यांवर लाठीहल्ला करणार्‍या सरकारने आमच्या गावात येऊ नये

अमरोहा, उत्तर प्रदेश-दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांवर लाठीहल्ला, अश्रुधूर आणि पाण्याचा मारा करणार्‍या भाजपा सरकारचा उत्तर प्रदेशातील अमरोहातील धनौरा तालुक्यातील ग्रामस्थांनी अनोख्या पध्दतीने निषेध नोंदवला आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवरच फलक लावून भाजपा नेत्यांना गावात येण्यास प्रवेशबंदी असल्याचे जाहीर केले आहे.

रसूलपूर माफी गावातील ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून एक फलक तयार केला. ‘भाजपा नेत्यांना गावात येण्यास सक्त मनाई आहे. आल्यास त्यांनी आपल्या जीवाचे रक्षण स्वतःच करावे’, असा इशारा बंदी फलकाद्वारे देण्यात आला आहे. तसेच जर आमच्या गावात भाजपा नेते मते मागण्यासाठी आले, तर ज्याप्रकारे दिल्लीच्या सीमेवर लाठीहल्ला करण्यात आला त्याचप्रकारे भाजपा नेत्यांचे आमच्या गावात स्वागत केले जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. रसुलपूर माफी या गावात जवळपास एक हजार मतदार आहेत.  आगामी निवडणुकीत या गावातून भाजपाला एकही मत दिले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. गावाच्या सीमेवरील भाजपाविरोधी फलकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा फलक पाहण्यासाठी आजुबाजूच्या गावातील लोकांची एकच गर्दी होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More