शेअर सायकल योजनेला विरोध करीत विरोधीपक्षाने महापौरांचा राजदंड पळविला!, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सायकल घेऊन महापालिका सभागृहात – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

शेअर सायकल योजनेला विरोध करीत विरोधीपक्षाने महापौरांचा राजदंड पळविला!, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सायकल घेऊन महापालिका सभागृहात

पुणे  – शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या शेअर सायकल योजना आणि स्वच्छता उपविधी योजनांसाठी आज विशेष मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये सायकल आराखड्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र या प्रस्तावाच्या विरोधासाठी महापालिका सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादी मनसे आणि शिवसेनेच्या सभासदांनी प्रचंड गोंधळ घातला. अखेर या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. भाजपच्या 66 नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. दरम्यान, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी महापौरांच्या आसनासमोर गोंधळ घालत या प्रस्तावाविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी महापौरांच्या आसनासमोरील राजदंड पळवून सभागृहाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधारी सदस्यांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत मानदंड ताब्यात घेतला. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये झटपट झाली. दरम्यान, सायकल शेअरींग योजनेचा प्रस्ताव 66 विरुद्ध शुन्य मतांनी मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे, भैय्यासाहेब जाधव, महेंद्र पठारे यांनी सभागृहामध्ये सायकल घेऊन प्रवेश केल्यामुळे आजची सभा अभूतपूर्व गोधळाची झाली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
मुंबई

वसई-विरार परिसरात 322 नवे कोरोनाचे रुग्ण

विरार – वसई-विरारमध्ये सध्या कोरोनाचा (coroan Virus) धोका वाढला असून तेथे एका दिवसात 322 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Positive Patients )आढळून आले. त्यामुळे वसई-विरारकरांमध्ये चिंतेत...
Read More
post-image
अर्थ देश विदेश

पीपल्स बँक ऑफ चायनाने एचडीएफसीतील गुंतवणूक कमी केली

नवी दिल्ली – भारतीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या पीपल्स बँक ऑफ चायनाने (People’s Bank Of China) हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कार्पोरेशन म्हणजेच एचडीएफसी (HDFC)या भारतातील...
Read More
post-image
देश

अरुणाचल प्रदेशात 6 नागा बंडखोरांचा खात्मा

इटानगर – अरुणाचल प्रदेशाच्या लोंडिंग जिल्ह्यातील निगीनू गावात आसाम रायफल्स- अरुणाचल प्रदेश पोलीसचे संयुक्त पथक आणि एनएससीएन संघटनेच्या नागा बंडखोरांमध्ये झालेल्या चकमकीत सहा बंडखोर ठार...
Read More
post-image
Uncategoriz देश

कर्नाटक मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना

बेळगाव- मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांचे गृह कार्यालय कृष्णा येथील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची (Corona Infected) लागण झाली आहे. टेलिफोन ऑपरेटर, दोन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात पकडलं, महाराष्ट्र एटीएसची कामगिरी

मुंबई – उत्तर प्रदेशातील आठ पोलीस हत्याकांडातील दोन आरोपींना ठाण्यातील कोलशेत येथून अटक करण्यात आली आहे. हे दोघेही विकास दुबेचे साथीदार होते. दरम्यान, या हत्याकांडातील...
Read More