शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन कंपनी करात कपातीची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. शेअर बाजाराचा हा मूड आजही कायम आहे. आज सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने १३०० अंकांनी उसळी घेतली. त्यामुळे शेअर बाजार ३९,३४६.०१ स्तरावर पोहोचला आहे. तर निफ्टीतसुद्धा २६८.५० अंकांची वाढ झाली असून तो ११,५४२.७० च्या स्तरावर आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने आजही आपली घौडदौड सुरू ठेवल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज आयटीसी, एल अँड टी, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स आणि एम अँड एमच्या शेअर्सचे दर ५ ते ७ टक्क्यांनी वाढले आहेत.

सीतारमण यांनी केलेल्या घोषणेनुसार सध्याच्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स ३० टक्क्यांहून घटवून २२ टक्के करण्यात आला आहे, तर १ ऑक्टोबर २०१९ नंतर सुरू होणाऱ्या नव्या कंपन्यांसाठी हा दर २५ टक्क्यांवरून घटवून १५ टक्के करण्यात आला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More