शिवानी आणि वीणा बिग बॉसच्या घरात राहण्यास अपात्र – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

शिवानी आणि वीणा बिग बॉसच्या घरात राहण्यास अपात्र

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर बाजार हे साप्ताहिक कार्य कालच संपले. या टास्कदरम्यान घरामध्ये खूप क्लेश, हातापायी आणि भांडण झाली. सदस्यांनी एकमेकांचे कपडे, सामान उधळून लावले. प्रत्येक सदस्य आपल्या टीमला टास्कमध्ये जिंकवण्याच्या मागे होता. परंतु यामध्ये सदस्य बिग बॉसच्या घराच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसले. वेळोवेळी बिग बॉसने ताकीद देऊनही पूर्ण टास्कमध्ये सदस्यांनी हे सुरूच ठेवले. याच चोर बाजार टास्कदरम्यान काल शिवानी आणि वीणामध्ये शाब्दिक चकमकीबरोबरच एकमेकांवर त्यांनी हात आणि लाथदेखील उचलली. बिग बॉसच्या घरात मारहाणी करणे अथवा कुठल्याही प्रकारची हिंसा अमान्य आहे हे सदस्यांना माहिती असूनही त्यांचा रागावर ताबा नसल्याने हे कृत्य शिवानी आणि वीणाकडून घडले. आता बिग बॉस या कृत्यावर घेणार कठोर निर्णय हे नक्की. या दोघींनी नियम तोडले आणि त्याचे समर्थन देखील केले. अशा वागण्यातून या दोघींची अखेळाडू वृत्ती दिसून येते आणि अशा प्रकारची हिंसा सुज्ञपणाच्या व्याख्येत मोडत नाही असे बिग बॉस यांनी दोघींनाही निक्षून सांगितले. अशा प्रकारच्या कोणत्याही घटना बिग बॉसच्या घरात घडू नये अथवा अशा घटना घडण्यासाठी त्याला चालना मिळू नये म्हणून बिग बॉसनी याससंदर्भात कठोर निर्णय सुनावला तो म्हणजे शिवानी आणि वीणा बिग बॉसच्या घरात रहाण्यास अपात्र आहेत. या निर्णयाने सगळ्या सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मुंबई

मरकजला गेलेल्यांनी संपर्क केला नाहीतर कारवाई करू – मुंबई मनपा

मुंबई – राजधानी दिल्लीत तबलिगी मकरजला जे गेले होते, त्यांनी ताबडतोब मुंबई महापालिकेशी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपल्या प्रवासाची माहिती द्यावी, असे...
Read More
post-image
महाराष्ट्र

अंबरनाथमध्ये कोरोनाचा पहिला बळी

ठाणे – जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये सापडलेल्या पहिल्या रुग्णाचा आज मृत्यू झाला. त्याच्यावर मुंबईतील भाभा रुग्णालयात उपचार सुरु होते. अंबरनाथमधील बुवापाडा परिसरातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे...
Read More
post-image
देश

मुंबईतही ‘ऑनलाईन लग्न’ वऱ्हाडी मंडळीही उपस्थित

मुंबई – लॉकडाऊन असताना आता मुंबईतही एका तरुणाचा ऑनलाईन लग्न सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात दोन्ही बाजूची वऱ्हाडी मंडळी सहभागी झाली...
Read More
post-image
विदेश

इक्वाडोरच्या गल्लीत पडली 150 प्रेते, लोक त्यांच्याजवळ जायलाही घाबरतात

क्विटो – कोरोनाच्या महामारीने जगातील 200 देशांना विळखा घातला आहे. अमेरिकेपाठोपाठ लॅटिन अमेरिकेतील इक्वाडोर या लहानशा देशातही कोरोनाने थैमान घातले आहे. या देशातील गुयाक्विल...
Read More
post-image
विदेश

कोरोनाचा राग मोबाईल यंत्रणेवर

बर्मिंघम – करोनाच्या वाढत्या संसर्गाप्रमाणे काही देशांना सोशल मीडियातून फैलावणाऱ्या फेक न्यूजचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियातून करण्यात येणाऱ्या विविध दाव्यांमुळे प्रशासकीय यंत्रणांसमोर आव्हान...
Read More