शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत प्रचंड गदारोळ – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत प्रचंड गदारोळ

नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकावरून आज विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गोंधळ झाला. अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाची उंची कमी केल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. परंतु वाऱ्याचा वेग, लाटांची तीव्रता आणि हवा यांचा विचार करुन तज्ज्ञांनी आराखडा तयार केला असून स्मारकाची उंची कमी केलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. तर मुख्यमंत्र्यांनी यावेळी कॉंग्रेसवर कडाडून टीका केली, ’15 वर्ष सत्तेत असून यांनी काय केलं आणि आता प्रश्न उपस्थित करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत’, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र विरोधकांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. कॉंग्रेस आमदारांनी यावेळी सभागृह डोक्यावर घेतले. तर या सगळ्या गोंधळात आमदार अब्दुल सत्तार यांनी सभापतींच्या समोरील राजदंड पळवला. या गदारोळामुळे विधानसभा 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त मलायकाने शेअर केला रोमॅण्टिक फोटो

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने काल आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिनी बॉलिवूडकडून तंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर याच खास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पंतप्रधान मोदी जी-20 परिषदेसाठी जपान दौऱ्यावर

ओसाका – जपानच्या ओसाकामध्ये आजपासून जी-२० परिषदेस सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० परिषदेत सामील होण्यासाठी ओसाकाला पोहोचले आहेत. मोदी ओसाका विमानतळावर पोहोचताच त्यांचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कैलास मानसरोवर यात्रेतील २०० भारतीय भाविक नेपाळमध्ये अडकले

काठमांडू – तिबेटमध्ये कैलास मानसरोवरची यात्रा करून घरी परतणारे जवळपास २०० भारतीय भाविक हवामान बदलामुळे नेपाळच्या हुमला जिल्ह्यात अडकले आहेत.यापैकी बहुतांश तेलंगणाचे रहिवासी आहेत. या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 आज भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More