शिवस्मारकाची बाजू मांडण्यास अधिकारी कमी पडले; मेटेंचा आरोप – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

शिवस्मारकाची बाजू मांडण्यास अधिकारी कमी पडले; मेटेंचा आरोप

मुंबई – राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवस्मारकाला सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक मुद्यांवर स्थगिती दिली आहे. मात्र, तरी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आठवड्याभरात शिवस्मारकाचे काम पुन्हा सुरू केले जाईल, असा विश्वास शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केला. तसेच कोर्टात शिवस्मारकाची बाजू मांडण्यास अधिकारी कमी पडले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सुमारे 3 हजार 600 कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याच्या प्रकल्पाचे काम सर्वोच्च न्यायालयाने रोखले आहे. हे काम सुरू करण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ’वर्क ऑर्डर’ काढली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश मिळेपर्यंत हे काम सुरू न करण्याचे तोंडी निर्देश दिले आहेत. शिवस्मारक प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने 2011 रोजीच्या सीआरझेड नियमावलीत दुरुस्ती केली होती. या दुरुस्तीला ‘द कन्झर्वेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर स्मारकाच्या कफ परेड येथील साईट कार्यालयामध्ये येऊन एलअँडटी कंपनीच्या अधिकार्‍यांना काम थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्मारक समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, सार्वजनिक बांधकाम, विधी व न्याय विभाग आणि कोस्ट गार्डचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर मेटे यांनी सांगितले की, शिवस्मारकाचे काम सुरू करताना जनसुनावणी घेतली नाही. या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने तोंडी स्थगितीचे आदेश दिले आहेत. शिवस्मारकाच्या कामाच्या ठिकाणी लोकवस्ती नसल्यामुळे जनसुनावणीची गरज नाही. आम्ही सरकारच्यावतीने भक्कम बाजू न्यायालयात मांडू. विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करून शिवस्मारकारवर टीका करत आहेत. कोर्टात बाजू मांडण्यात अधिकारी कमी पडले याचीही शहानिशा करू. कोणत्याही परिस्थितीत शिवस्मारक उभारूच, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More
post-image
मुंबई

घाटकोपरमध्ये कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या

मुंबई – घाटकोपर येथे कोचिंग क्लास चालकाची भर वर्गात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घाटकोपर येथे मयांक ट्युटोरियल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अमित शहा २६ सप्टेंबरला पुन्हा मुंबईत

मुंबई – महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार असल्याची घोषणा करत भाजपा राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबईतील गोरेगाव येथील सभेत विधानसभेच्या प्रचाराचा...
Read More