शिवसेनेवर अंकुश ठेवायला पालिकेत प्रविण परदेशी नियुक्त – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई राजकीय

शिवसेनेवर अंकुश ठेवायला पालिकेत प्रविण परदेशी नियुक्त

मुंबई – मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून प्रविण परदेशी यांची नियुक्ती केल्यानंतर नवे काही घडेल, अशी मुळीच अपेक्षा नाही. पूर्व आयुक्त अजोय मेहता हे जसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तालावर नाचत होते तसेच प्रविण परदेशी कार्य करणार आहेत. किंबहुना शिवसेनेवर अंकुश ठेवण्यासाठीच त्यांना आणले आहे.

भाजपाला त्यांच्या धोरणानुसार शिवसेना संपवायची आहे. तूर्त नाईलाजास्तव त्यांची युती असली तरी ही युती दीर्घकाळ टिकावी असे भाजपाला वाटात नाही. शिवसेना संपवायची तर त्यांची आर्थिक रसद बंद होणे आवश्यक आहे आणि ही रसद म्हणजे मुंबई महापालिका आहे. या पालिकेत शिवसेनेची ताकद संपवणे गरजेचे आहे. याच हेतूने आधी अजोय मेहता यांना पालिका आयुक्त पदावर बसविले होते आणि आता प्रविण परदेशींना आणले आहे. प्रविण परदेशी हे मुख्यमंत्र्यांचे निकटचे सचिव म्हणून मंत्रालयात ओळखले जायचे. शिवसेनेवर नजर ठेवण्यासाठी आपल्या या विश्‍वासू माणसालाच मुख्यमंत्र्यांनी नियोजन करून पालिकेच्या आयुक्त पदावर बसविले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More