शिवसेनेला युतीत घेण्यासाठी भाजपचा गळ, दिली उपाध्यक्षपदाची ऑफर – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

शिवसेनेला युतीत घेण्यासाठी भाजपचा गळ, दिली उपाध्यक्षपदाची ऑफर

मुंबई – गेल्या चार वर्षापासून रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपाध्यक्षपदाची ऑफर देऊन भाजपने शिवसेनेभोवती फास टाकल्याची चर्चा आहे. शिवसेना उपाध्यक्षपद स्वीकारणार का? हे गुरूवारी स्पष्ट होईल.

राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज बुधवारी सभागृहात केली. या निवडणुकीसाठीची गुरूवारी (ता. 29) सकाळी 11.45 वाजेपर्यंत विधानमंडळाचे प्रधान सचिव यांच्या दालनात अर्ज दाखल करायचा आहे. या अर्जाची छाननी प्रधान सचिव यांच्या दालनात दुपारी 12 वाजता होईल.

उमेदवारी माघारी घ्यावयाची असल्यास त्याबाबतची लेखी सूचना प्रधान सचिवांकडे शुक्रवारी (ता. 30) सकाळी 10.30 वाजेपर्यंत स्वत: उमेदवाराने किंवा त्याच्या अनुमोदकाने आणून देणे आवश्यक आहे. त्यानुसार गरज भासल्यास शुक्रवारी सकाळी 11.30 ते दुपारी 1 वा वेळेत विधानसभा सभागृहात मतदान घेतले जाणार आहे. दुपारी 1. 30 वाजता सभागृहाची बैठक पुन्हा सुरु होईल.

शिवसेनेला युतीत घेण्यासाठी भाजपचा गळ

मागील चार वर्षापासून रिक्त असलेले विधानसभा उपाध्यक्षपद शिवसेनेला देऊन भाजपने शिवसेनेला युतीत घेण्यासाठी गळ टाकला आहे. पदावर शिवसेनेचे पारनेरचे आमदार विजय औटी यांनी वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधानसभेत भाजप 123 आणि शिवसेनेचे 63 असे संख्याबळ असून विरोधकांपेक्षा (85) तगडे असल्याने ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून अहमदनगरमधील पारनेरचे आमदार विजय औटी यांचे नाव आघाडीवर आहे. संजय शिरसाठ, सुभाष साबणे यांच्याही नावाची चर्चा आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More