शिवसेनेला धक्का; डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन राजकीय

शिवसेनेला धक्का; डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई – मराठी अभिनेते आणि शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र आज या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अमोल कोल्हे यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता त्यांना लोकसभेसाठी शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसं झाल्यास तेथील शिवसेनेचे विद्यमान खासदार अढळराव पाटील यांना जोरदार टक्कर मिळू शकते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे उद्या नाशिक शहरात जाणार

नाशिक – शिवसेना नेते आणि युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गुरुवारी सुरुवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी ‘ही जनआशीर्वाद यात्रा निवडणुकीसाठी किंवा प्रचारासाठी नाही....
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : सोज्वळ अभिनेत्री उमा भेंडे

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ३१ मे १९४५ साली कोल्हापूर येथे झाला. सोज्वळ अभिनेत्री म्हणून उमा भेंडे यांनी मराठी रसिक मनावर...
Read More
post-image
देश

सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता! ३६ हजाराच्या घरात जाणार

मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोने महागण्याची चिन्हे दिसत आहेत. आज सोन्याचा भाव सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याच्या विचारात...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरच्या सातपाटी परिसरात यंदा पापलेटच्या उत्पादनात घट

पालघर – राज्यासह जगभरात निर्यात होणार्‍या पालघरच्या सातपाटी परिसरातील पापलेट या मत्स्याच्या प्रकारामध्ये यंदा प्रचंड घट झाली आहे. पापलेटचे उत्पादन गेल्या हंगामापेक्षा 190 टनांनी घटले...
Read More
post-image
देश

मनोहर पर्रिकरांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

पणजी – गोव्यामधील मिरामार बीचवर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी गोव्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात...
Read More