शिवसेनेने आधी मुंबई बुडवली, नंतर खड्ड्यात घातली – अजित पवार – eNavakal
News आघाडीच्या बातम्या राजकीय

शिवसेनेने आधी मुंबई बुडवली, नंतर खड्ड्यात घातली – अजित पवार

मुंबई – शिवसेनेने यंदा आधी मुंबई पावसात बुडवली, त्यानंतर ती खड्ड्यात घातली, गेली 23 वर्ष मुंबईवर शिवसनेची सत्ता असताना त्यांनी काहीच केले नसल्याची घणाघाती टीका अजित पवार यांनी केली. ते आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. संसदेतील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला असता, पण हुकूमशाही पद्धतीने तो पास होऊ शकला नाही, असे मत व्यक्त करीत त्यांनी भाजपवरही टीकेची झोड उठवली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शन शिबिराचे सकाळी उद्घाटन केले. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकून टाकण्याचे आवाहन केले. आगामी निवडणूक लक्षात घेता कार्यकर्त्यांनी सरकारचे झालेले अपयश पटवून द्यावे, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. अजित पवार यांनी मार्गदर्शन मेळाव्यात शिवसेना-भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिले, त्यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप-सेनेचे सरकार असतानाही अपयशी आहे. ते सर्व कार्यकर्त्यांनी विचार करून जनतेला सांगितले पाहिजे.
दरम्यान, पक्षांतर्गत गटबाजीवर अजित पवार यांनी आक्रमकपणे प्रहार केला. पक्षात अंतर्गत वाद विकोपाला जाऊन देऊ नका. एकमेकांना मान द्या, असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. चार दिवस सासूचे या म्हणीसारखे लोकप्रनिधी, पदाधिकारी यांनी वागले पाहिजे. बेरजेचे राजकारण करण्यासाठी आपली ताकद वाढवण्यासाठी इतर पक्षांना सोबत घेत आहोत. मुंबईत एकही आमदार-खासदार नाही, अशी खंतही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
शरद पवार हे ७८ वर्षांचे असताना पायाला भिंगरी लावून पक्ष आणि देश वाढवायचा प्रयत्न करत आहेत. काही कार्यकर्ते हे केवळ राष्ट्रवादी पक्षाचे नाव पद लावतात. त्यांची माहिती मिळाल्यावर त्यांना काढून टाकतो, असा त्यांनी इशारा दिला.  केव्हाही लोकसभा आणि राज्यसभा निवडणूक जाहीर होऊ शकतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. ज्यांच्यात धमक असेल त्या नव्या नेत्यांना पक्ष संधी देईल, असे सांगत त्यांनी पक्षातील फेरबदलाचे संकेत दिले. जातीपातीचा धर्माचा विचार न करता राष्ट्रवादी पक्ष त्यांना आधार देतो, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

तेलुगु कवी वरावरा राव यांना कोरोनाची लागण

मुंबई – तळोजा तुरुंगात असलेले वरावरा राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते....
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाढदिवसासाठी महत्त्वाची घोषणा

मुंबई – राज्यावरील कोरोनाचं संकट व त्यानिमित्तानं घ्यावयाच्या खबरदारीची स्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला...
Read More
post-image
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची चर्चा

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी, भारताची मागणी मान्य

नवी दिल्ली – भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असून त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तान सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार भारतीय उच्चायोगाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मालाडनंतर फोर्टमध्येही इमारतीचा भाग कोसळला, अनेकजण दबल्याची शक्यता

मुंबई – मालाडच्या मालवणी परिसरात दुमजली इमारतीचा भाग कोसळल्यानंतर आता पुन्हा फोर्ट येथील भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला आहे.या इमारतीचं पूनर्बांधणीचं काम सुरू असल्याची...
Read More