शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अटक – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अटक

औरंगाबाद – क्रांतीचौक पोलीस ठाण्यात केलेल्या तोडफोडीच्या आरोपावरून शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अटक करण्यात आली आहे.  औरंगाबाद हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यामुळे प्रदीप जयस्वाल यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसोबत गोंधळ घालून काच फोडल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. त्यांना न्यायालयात हजर करण्यात अाले असून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

औरंगाबादमध्ये 11 व 12 मे रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अनेक जणांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी गांधीनगर येथील दोन आरोपी क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये अटकेत होते. या आरोपींना तत्काळ जामिनावर सोडण्याची मागण करत शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जयस्वाल रविवारी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान क्रांती चौक पोलीस स्थानकात आले. ठाणे अमंलदारांनी आरोपींना सोडण्यास असमर्थता दाखवल्यानंतर त्यांनी त्याच्याशी हुज्जत घातली शिवाय ठाण्यात तोडफोड केली. या प्रकरणी त्यांच्या विरोधात 353, 332, 504 ,506, 427 कलमासह शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे त्यांना सोमवारीआज दुपारी 2.50 वाजता दरम्यान त्यांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात दाखल केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली असून जैस्वाल उद्या जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे समझते. दरम्यान जायस्वाल यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

 

 

 

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More