शिवसेना मराठी माणसासाठी नाही पैशांसाठी आहे! मराठी टक्का कमी का झाला? – eNavakal
News मुंबई

शिवसेना मराठी माणसासाठी नाही पैशांसाठी आहे! मराठी टक्का कमी का झाला?

मुंबई – शिवसेना मुंबईत 52 वर्ष आहे. पालिकेत सत्तेत आहे, असे असताना मुंबईतील मराठी माणसाचा टक्का का घसरला? शिवसेना ही पैशासाठी आहे. मराठी माणसांसाठी नाही. पैसे खाणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष व खासदार नारायण राणे यांनी केली.
वांद्रे रंग शारदा सभागृहात कार्यक्रमाच्या मेळाव्यात ते बोलत होते. राणे पुढे म्हणाले शिवसेना भाजपासोबत सत्तेत असून, वाईट भाषा वापते. सत्तेतून बाहेर पडू, सत्तेवर लाथ मारू, यांच्या खिशातले राजीनामे बाहेर पडत नाहीत. यांनी खिशे शिवले आहेत. शिवसेनेने सगळ्यात पार्टनर व्हायचे, तडजोडी करायच्या हे काम केूले आहे. शिवसेनेची सत्ता असताना बेस्ट कर्मचार्‍यांना 9 दिवस संप का करावा लागला? शिवसेनेचे दाखवायचे दात वेगळे व खायायचे दात वेगळे आहेत. शिवसेनेला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धडा शिकवायचा हा प्रचार स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करायचा आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला बनवा बनवी करायची मशीन घेतली आहे, अशी टीका करत नारायण राणे म्हणाले काँग्रेसचे मैदान साफ आहे. फक्त अशोक चव्हाण दिसतात. सर्व पक्षिय आघाडी कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. आघाडीत आम्हाला जायायचे नाही. म्हणून माझ्या पक्षाला आघाडी नको, युती नको, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत आणि लोकसभेची उमेदवारी आम्ही टप्प्याटप्प्याने जाहीर करणार आहोत.
काँग्रेसचे आमदार नितेश राणे आपल्या भाषणांत म्हणाले, केेंद्र सरकारने अतिरेक्यांना व पाकिस्तानला कडक उत्तर दिले पाहिजे. राजकीय पक्षांनी या देशाची विश्वासार्हता गमावली आहे. आपण प्रत्युत्तर का देत नाही? जवानाचे प्राण का वाचवत नाही. असा केेंद्र सरकारला सवाल करून नितेश राणे पुढे म्हणाले, आपले जवान शहीद झाले असताना मातोश्रीवर बैठका व चर्चा निवडणुकीच्या सुरू होत्या. म्हणून सांगतो स्वाभिमानी पक्षाची गरज राज्याला व देशाला आहे. ही परिस्थितीची जाणीव मतदारांना करून देण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण करा. आपण जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. कालच्या हल्ल्याचा वचवा काढण्यासाठी लोकसभा विधानसभा निवडणुकीत ही आपली ताकद दाखवून घ्या. नारायण राणेंचे मार्गदर्शन घेऊन स्वाभिमानी पक्षाबद्दल निवडणुकीत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा राणेचा पक्ष हे काम करू शकतो हे दाखवून घ्या. 2019 चा प्रत्येक दिवस स्वाभिमानी पक्षासाठी असला पाहिजे, असे नितेश राणे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, या मेळाव्यात स्वाभिमानी पक्षाकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार निलेश राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

वयाच्या ७९ व्या वर्षी राज्यपालांनी किल्ले शिवनेरी केला सर

पुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

भारतीय क्रिकेटचा गौरवशाली अध्याय संपला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई – माजी क्रिकेटपटू, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू चेतन चौहान यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे, महान खेळाडू सुनील गावस्कर यांच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत  ३२० नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३२० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ३४१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३२० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादु्र्भाव वाढत असताना अनेक नेत्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनाही कोरोनाची लागण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज नव्या ११ हजार १११ रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे...
Read More