पारनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक झाल्याच्या वृत्ताने खळबळ – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

पारनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक झाल्याच्या वृत्ताने खळबळ

अहमदनगर – शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पारनेर (जि.नगर) येथे शिवसेनेचा मेळावा पार पडला. मेळावा संपल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या गाडीचा ताफा सभास्थानावरून निघून गेल्यानंतर एका गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली. याप्रकाराने शिवसेना मेळाव्याला एक प्रकारे गालबोट लागले. ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचे वृत्त चुकीचे असून तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पारनेर येथे उध्दव ठाकरे यांची सभा झाली. या कार्यक्रमाचे आयेाजन शिवसेना आमदार विजय औटी यांनी केले होते. उध्दव ठाकरे सभास्थानी असताना तालुका प्रमुख निलेश लंके समर्थकांसह कार्यक्रमस्थळी शक्तीप्रदर्शन करत आले. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. सभा संपवून ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा हेलिपॅडकडे जात असताना काही वेळाने पाठीमागून आलेल्या एका गाडीवर दगडफेक झाली. या दगडफेकीत सदर गाडीची मागची काच फुटली या घटनेमुळे सभास्थानी मोठा तणाव निर्माण झाला होता.
या घटनेनंतर उध्दव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. या घटनेवर शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. राठोड म्हणाले की, सभा संपल्यानंतर मी उभा असताना एक ईनोव्हा गाडीचालकाने गाडी जोरात घेऊन जात असताना माझ्या व जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या पायारून गाडी घातली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांपैकी एकाने गाडीवर दगड फेकला. यानंतर काही वेळातच मी स्वतःला सावरून वाहनचालकांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान, दगफेक करणारे तालुका प्रमुख निलेश लंके यांचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत लंके तसेच शिवसेना यांच्याकडून अधिकृत सांगण्यात आले नाही. पारनेर तालुक्यात आ.विजय औटी व तालुका प्रमुख निलेश लंके यांच्या गटामध्ये गेल्या काही दिवसांपासून गटबाजी सुरु आहे. लंके हे शिवसेनेकडुन विधानसभेसाठी इच्छूक आहेत. या गटबाजीमुळेच हा प्रकार घड्ल्याचे सांगण्यता येत आहे. निलेश लंके यांची तालुका प्रमुख पदावरुन हाकालपट्टी करण्यात आल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, लंके यांची हाकालपट्टी करण्यात आलेली नाही पक्षश्रेष्ठीकडून असा कोणताही आदेश आलेला नाही असे दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More